Funny Viral Video : पती पत्नीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी दिसून येते. दोन व्यक्ती लग्न करून नव्या आयुष्याची सुरूवात करतात आणि आयुष्यभर एकमेकांबरोबर राहण्याचे वचन देतात. लग्नाच्या सुरुवातीला ते एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करतात, मनातील भावना व्यक्त करतात पण मुले मोठी झाली आणि संसार जसा जसा वाढत जातो, तसे ते प्रेम व्यक्त करत नाही. एकमेकांविषयी मनात असलेल्या भावना व्यक्त करत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अचानक एक दिवस जेव्हा काका काकूला आय लव्ह यू म्हणतात. तेव्हा नेमकं काय घडतं? हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. कार्यक्रमातील अँकर एका काकाला समोर बोलावतो आणि त्यांच्या घरी फोन लावतो आणि काकूला 'आय लव्ह यू' म्हणायला सांगतो. काका जेव्हा काकूला 'आय लव्ह यू' म्हणतात, तेव्हा काकूंची काय प्रतिक्रिया असते, हे आज आपण जाणून घेऊ या. हेही वाचा : Pune : “जग फिरून या पण पुण्यासारखं शहर नाही…” Viral Video एकदा पाहाच काका - हॅलोकाकू - अं काय ओ..?काका - काय करायलीस?काकू - कोण?काका - तूकाकू - काय करू?काका - आय लव्ह यूकाकू - काय?काका - आय लव्ह यूकाकू - कसं काय? कशामुळं!काका - उगं! आय लव्ह यूकाकू - येडं बीड झालाव का?काका - खूप प्रेम आहे ग तुझ्यावरकाकू - अं… हो का?काका - खरंचकाकू - हो का? बरं..काका - आय लव्ह यूकाकू - हॅलोकाका - उत्तर दे की तू पण म्हण आय लव्ह यूकाकू - कुठं हाव तुम्हीकाका - कार्यक्रमातकाकू - काय येड्यासारखं ओकाका - आय लव्ह यूकाकू - अईईईई..ठेवा हर उगं फोनकाका - अगं आय लव्ह यू गकाकू - ठेवा फोन. काका काकूंचा हा संवाद ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांच्या पती किंवा पत्नीची आठवण येईल तर काही लोकांना त्यांचे जुने दिवस आठवतील. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. पाहा व्हायरल व्हिडीओ sushilsuryawanshi05 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, "अचानक केला बायकोला कॉल.." या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, "बायकोला जर विषय बदलायचा असेल तर लगेच म्हणतात कुठे आहात? कसे गेलात?" तर एका युजरने लिहिलेय, "खूप छान आहे व्हिडिओ" आणखी एका युजरने लिहिलेय, "काका नाही आवरत i love u too म्हणाल्याशिवाय" आणखी एका युजरने लिहिलेय, "साधी भोळी माणसं"