Viral Video : सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरून हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणाने त्याच्या दुचाकीवर तरुणीचा पुतळा बसवला आहे आणि या पुतळ्यासह हा तरुण दुचाकी संपूर्ण शहरात फिरवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

नुकताच व्हॅलेंटाईन डे पार पडला. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस असतो. प्रत्येक जण आपल्या प्रिय व्यक्तीजवळ त्यांचे प्रेम व्यक्त करतो आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवतो पण विचार करा जेव्हा व्हॅलेंटाईन डे ला जर तुम्ही सिंगल असाल तर काय कराल? जेव्हा व्हॅलेंटाईन डे ला तुमच्याजवळ गर्लफ्रेंड नसते, तेव्हा तुम्ही काय करू शकता, असे या व्हिडीओमध्ये मजेशीरपणे सांगितले आहे. अर्थातच हा व्हिडीओ लोकांच्या मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे पण सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंदौर शहरातील आहे.

Proud father daughter slected in indian navy emotional video
“मुलगी जेव्हा वडिलांच्या नजरेत जिंकते ना…” इंडियन नेव्हीमध्ये निवड झालेल्या लेकीचा वडिलांना अभिमान; भररस्त्यातला VIDEO व्हायरल
Horrible video
VIDEO : बापरे! चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने केला हल्ला, व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा
an old lady dance on 90s famous song
90’s च्या गाण्यावर आजीने केला भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल
When Indian young woman wears saree and takes over streets of Japan
Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते, तेव्हा.. पाहा व्हायरल व्हिडीओ
a man beating innocent dog in a moving lift
VIDEO : बापरे! लिफ्टमध्ये कुत्र्याला अमानुषपणे मारहाण, सीसीटिव्ही फुटेज व्हायरल; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
snake attack on a man wrap around door handle
जरा सांभाळून! दरवाज्याचे हँडल पकडताच सापाने केला हल्ला, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
viral video a groom girlfriend reach on wedding stage
लग्नात अचानक पोहोचली नवरदेवाची एक्स गर्लफ्रेंड ; भर मंडपात नवरी अन् गर्लफ्रेंडमध्ये तुफान राडा, व्हिडीओ होतोय व्हायरल
ukhana video a newlywed man said ukhana for wife
“बायकोसमोर सोनं आहे लोखंड..” नवऱ्याचा भन्नाट उखाणा अन् नवरी लाजली, VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : तरुणीसह लावणीवर थिरकला तरुण! सादर केली अप्रतिम लावणी, व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दुचाकी चालवताना दिसेल आणि त्याच्या दुचाकीवर त्याच्या मागे एक तरुणी बसलेली दिसेल. खरं तर ती खरी खुरी तरुणी नाही तर तरुणीचा पुतळा आहे. या तरुणाने त्याच्या दुचाकीवर तरुणीचा पुतळा बसवला आहे आणि शहरात दुचाकी फिरवताना दिसत आहे. त्याच्या दुचाकीवर तरुणीचा पुतळा पाहून अनेक जण हसताना दिसत आहे. रस्त्यावरील लोकांना हसू आवरत नाही. तरुण-तरुणी, महिला, लहान मुले, काका, आजोबा सर्व जण या तरुणाच्या दुचाकीकडे पाहून हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

indoripaltan_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जेव्हा तुमच्याजवळ गर्लफ्रेंड नसते तेव्हा असा व्हॅलेंटाईन डे साजरा करा..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
एका युजरने लिहिलेय, “ज्यांचे लग्न जुळत नाही, त्यांच्यासाठी हा एक चांगला उपाय आहे” तर एका युजरने लिहिलेय, “ही परफेक्ट आहे भाऊ, तिचं तुम्हाला ऐकावं सुद्धा लागणार नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “इंदौर मध्ये भाऊ काही पण करू शकतो”