scorecardresearch

Optical Illusion : या फोटोतला कोणता चेहरा तुम्हाला आधी दिसला? यावरून कळेल तुमचं व्यक्तिमत्व आणि स्वभाव

या फोटोत एका चेहऱ्यात दोन चेहरे लपलेले आहेत.

आपण जेव्हा एखादं चित्र किंवा फोटो पाहतो तेव्हा त्यावर आपली नजर खिळून राहते. फोटो किंवा चित्रात नेमकं काय आहे? याबाबत उत्सुकता असते. रंगसंगतीसोबत त्यामागच्या भावना शोधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. चित्रकलेत अनेक प्रकार आहेत. त्यापैकी ऑप्टिकल इल्युजन एक प्रकार आहे. या चित्रांमधून आपल्याला सहज उत्तर मिळणं कठीण होत. त्यामुळे अशी चित्र पाहताना आपण बांधलेला अंदाज आणि त्यामागे दडलेलं चित्र यात फरक जाणवतो. त्यामुळे अनेकदा ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो समजणं कठीण होतं. सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्यूजन असलेले असंख्य फोटो व्हायरल होत असतात. या फोटोमध्ये तुम्हाला पूर्णपणे अडकवून ठेवण्याची क्षमता आहे. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या ऑप्टिकल इल्युजन फोटोमध्ये दोन चेहरे लपलेले आहेत. आता तुम्ही पहिल्यांदा तो फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला कोणता चेहरा दिसतो, यावरून तुमचे व्यक्तिमत्व कळेल. गेल्या काही दिवसांपासून ऑप्टिकल इल्युजन असलेले अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये कधी कधी असे फोटो किंवा आकृत्या दडलेल्या असतात, ज्या आपल्याला लवकर दिसत नाही, असाच हा फोटो आहे. या फोटोत एका मुलीचा चेहरा दिसतोय. हा फोटो पाहिल्यानंतर त्यातल्या एका फोटोवर नजर खिळत नाही. त्यामुळे या फोटोत नेमकं काय दडलंय, हे समजण्यास अनेकांना अडचणी येत आहेत.

जसं आम्ही तुम्हाला आधी सांगितलं की या फोटोत एका चेहऱ्यात दोन चेहरे लपलेले आहेत. पहिला प्रोफाईल  आणि दुसरा समोरचा चेहरा. जर तुम्हाला प्रथम प्रोफाइल चेहरा दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही भावनेच्या भरात वाहून जाणारे नाहीत. उलट तुम्ही प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास सक्षम आहात. यासोबतच, तुम्ही सकारात्मक विचारसरणीचे, आशावादी व्यक्ती आहात आणि तुम्ही नेहमी सर्वांच्या मदतीसाठी तयार असते.

जर तुम्हाला समोरचा चेहरा दिसला असेल तर याचा अर्थ तुम्ही खूप दृढनिश्चयी आहात. असे लोक प्रत्येक आव्हानाला तोंड देतात. तसेच हे लोक ध्येय साध्य करण्यासाठी कठीण परिश्रम करतात. तर अशी आहे या फोटोमागची कहाणी. त्यामुळे तुम्हाला या फोटोत सर्वात आधी कोणता चेहरा दिसला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. शिवाय तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत हा फोटो नक्की शेअर करा.  

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Which face you first saw in this optical illusion double face viral photo hrc

ताज्या बातम्या