scorecardresearch

आई मेहंदी लावत असताना निरागस मुलाने स्वतःच्या हाताने भरवलं; हा सुंदर व्हिडीओ नक्की पहा

व्हिडीओमध्ये आई आणि मुलामधील बंध सुंदरपणे टिपले गेले आहेत. व्हिडीओला १७ हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

Little boy feeds mom
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @gracesalons/ Instagram )

सोशल मीडियावर अनेकदा अतिशय गोंडस व्हिडीओ शेअर केले जातात जे नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतात. अलीकडेच ग्रेस सलूनच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला कॅप्शन दिले होते की, “हा लहान मुलगा त्याची आईला मेंदी लाऊन घेत असल्यामुळे तिला भरवत आहेत , हे किती गोंडस आहे.”

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुलगा आणि त्याची आई यांच्यातील एक गोड क्षण कॅमेरात कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये एक महिला ब्युटी पार्लरमध्ये सोफ्यावर बसून हातावर मेहंदी लावत आहे. तिच्या शेजारी उभा असलेला तिचा लहान मुलगा तिला खायला घालताना दिसत आहे. ती तेव्हा दोन्ही हातावर मेहंदी काढण्यात व्यस्त आहेत.

पंजाबी नाटक लाहोरीये मधील अखर हे गाण पार्श्वभूमी व्हिडीओला अजूनच रंजक बनवत आहे.

गेल्या महिन्यात शेअर केलेल्या या साध्या व्हिडीओने खूप आकर्षण निर्माण केले कारण ते आई आणि मुलामधील सौम्य प्रेम आणि करुणा दर्शवते. व्हिडीओमध्ये आई आणि मुलामधील बंध सुंदरपणे टिपले गेले आहेत. व्हिडीओला १७ हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-11-2021 at 17:52 IST

संबंधित बातम्या