अंकिता देशकर
WHO Chief COVID 19 Vaccination: कोविडची लाट ओसरली असली तरी अजूनही निपाह, इन्फ्लुएंझा यांसारखे व्हायरस पसरत आहेत. अलीकडेच भारतात निपाह व्हायरसमुळे चिंता वाढली होती. याचदरम्यान एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे लाइटहाऊस जर्नालिज्मला आढळून आले. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोस गेब्रेयसस यांनी कोविड-19 साठीची लस घेतलेली नाही. नेमकं हे प्रकरण काय आहे हे व त्याची सत्यता किती हे पाहूया..
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Antonio Tweets ने व्हायरल पोस्ट आपल्या प्रोफाइल वर शेअर केली.
इतर वापरकर्ते देखील व्हायरल दावा शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही गुगल सर्च करून आमचा तपास सुरू केला. आम्हाला असोसिएटेड प्रेसच्या वेबसाइटवर प्रकाशित एक लेख सापडला.
लेखात असेही नमूद केले आहे की ही क्लिप एका डॉक्युमेंटरीची आहे ज्यामध्ये डॉ गेद्रेयसस कोविड-19 लसींविषयी बोलताना पाहायला मिळत आहे. यावेळी डॉ. म्हणतात की जगभरात प्रत्येक देशाला कोविड १९ च्या लसींचा वाटा मिळेपर्यंत त्यांनी स्वतः लस घेण्यासाठी वाट पाहिली होती. याच लेखात आम्हाला या डॉक्युमेंटरी ची लिंक देखील सापडली आहे.
नंतर आम्ही ट्विटरवर कीवर्ड शोधले आणि WHO प्रमुखांच्या व्हेरीफाईड ट्विटर हँडलवर एक पोस्ट आढळली जिथे ते कोविडची लस घेत असल्याचे दिसत होते.
हा फोटो १३ मे २०२१ रोजी पोस्ट केलेला होता. आम्हाला science.org वर एक लेख देखील सापडला.
इंटरव्यूचे शीर्षक होते: ‘I’m still feeling that we’re failing’: Exasperated WHO leader speaks out about vaccine inequity. हा लेख 18 जून २०२१ रोजी पोस्ट केला होता.
शेवटच्या प्रश्नात, मुलाखतकार डॉ टेड्रोसला विचारतात, ‘तुम्ही एकदा लसीकरण केल्यावर कसे वाटले?’ ज्यावर ते म्हणतात अजूनही मला असं वाटत आहे की आपण फेल होत आहोत मी खूप निराश होऊन ही लस घेतली होती.
आम्ही डब्ल्यूएचओच्या मीडिया टीमशी देखील संपर्क साधला, त्यांनी पुष्टी केली की व्हायरल दावा खोटा आहे.
निष्कर्ष: डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी कोविड-19 ची लस घेतलेली नाही, असा व्हायरल दावा खोटा आहे.