वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारी ग्रेटा थनबर्ग अवघ्या काही महिन्यांत जगातील पर्यावरणीय चळवळीची आंतरराष्ट्रीय राजदूत झाली. २०१८ च्या डिसेंबरमध्ये पोलंडच्या कॅटोविस शहरातील जागतिक हवामान परिषदेस संबोधित करण्याचा मान शाळकरी ग्रेटाला मिळाला आणि २०० राष्ट्रांच्या प्रमुखांना तिने जाहीर फटकारले : ‘हवामानबदल समजून सांगण्याएवढे तुम्ही प्रगल्भ नाही. तुम्ही आम्हा बालकांवर अवाढव्य ओझे लादले आहे. लोकप्रिय होण्यासाठी धडपडण्याची मला आस नाही. मला आपली सजीव पृथ्वी आणि हवामान यांची काळजी आहे.’

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त

स्वीडनमधील नवव्या इयत्तेतील मुलगी ग्रेटा थनबर्ग ही हवामानबदलाच्या बातम्या ऐकून अस्वस्थ होत असे. तिने तिसरीत- म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी ‘हवामानबदल’ हा शब्द ऐकला आणि ती त्याच्या खोलात जाऊ लागली. ग्रेटाच्या शाळेत पर्यावरणाची हानी, हवामान- बदलामुळे होणारे भयंकर परिणाम यांविषयी माहिती दिली जायची, वृत्तपट दाखवले जायचे. त्याचवेळी जगभर होणाऱ्या घडामोडी जाणून घेत असताना संवेदनशील ग्रेटा दु:खी होत असे. परंतु त्याबद्दल ती कोणाशीही बोलत नसे. तिचे हे अबोलपण वाढतच गेले. अकराव्या वर्षी तिचे जेवण कमी झाले. ती बाहेर पडेनाशी झाली. तिचे घरातल्यांशिवाय इतरांशी बोलणे जवळपास बंद झाले. डॉक्टरांनी ‘विषण्णावस्थेमुळे स्वमग्नता’ असे निदान केले. परिस्थिती भीषण आहे हे पाहून गप्प व स्वस्थ बसायचे की निषेध व्यक्त करायचा, याचा तिने निर्णय केला आणि जाहीर बोलण्यास आरंभ केला. सुरुवात अर्थात घरापासूनच! कार्बनच्या पाऊलखुणा जाणणाऱ्या ग्रेटाने तिचे वडील (विख्यात अभिनेते) स्वान्त आणि आई (प्रसिद्ध नृत्यांगना) मलेना यांना शाकाहारी होण्यास प्रवृत्त केले. दोघांना विमानप्रवास बंद करायला लावला. या छोटय़ा मुलीने आई-वडिलांना उच्चभ्रू, उधळ्या जीवनशैलीकडून साधेपणाकडे नेले. २०१७ च्या ऑक्टोबर महिन्यात स्वीडनच्या जंगलात भयानक वणवा पेटला, तर २०१८ साली युरोपभर उष्णतेची लाट पसरली. हे पाहून तिने २० ऑगस्ट २०१८ रोजी ‘पर्यावरणासाठी विद्यालय बंद’ असा फलक रंगवला, शाळेत रजा टाकली आणि स्वीडनच्या संसदीय अधिवेशनाबाहेर ती ठाण मांडून बसली. तिच्या पालकांनी तिला या कृतीपासून परावृत्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

तिच्यासोबत कुणीही मित्र-मत्रिणी आले नाहीत. तरीही तिचा निर्धार ढळला नाही. संसदीय सदस्यांचे लक्ष वेधण्याकरिता ग्रेटा सकाळी ८.३० ते दुपारी ३ पर्यंत फलक घेऊन एकटीच बसून राहिली. दुसऱ्या दिवशीपासून मात्र तिच्याभोवती लोक जमा होऊ लागले. ग्रेटा बोलू लागली : ‘हवामान- बदलाविषयी सगळेच बोलतात. कृती कोणीच करीत नाही. निदान आपल्या देशाने (स्वीडन) पॅरिस करारानुसार कर्ब उत्सर्जन कमी करणे आवश्यक आहे.’ तेवढय़ात स्वीडनच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली. तिला लोकांसमोर भाषण करण्याचा आग्रह चालू झाला. पण ग्रेटाच्या पालकांना तिच्या तब्येतीची काळजी वाटत होती. ती मात्र तिच्या निर्णयाशी ठाम होती. ‘हवामानाकरिता जनयात्रा’समोर (पीपल्स क्लायमेट मार्च) ग्रेटाचे अतिशय छोटे, पण प्रभावी व्याख्यान झाले. ‘याचा जास्तीत जास्त प्रसार करून अधिकाधिक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा..’ या तिच्या आवाहनामुळे त्याची दृक्मुद्रणे समाजमाध्यमांतून सर्वदूर पोहोचली आणि या निरागस व कळकळीच्या आवाहनाने संपूर्ण जगाला भुरळ घातली. निवडणुकीनंतरही दर शुक्रवारी ग्रेटा लोकांना हवामान- बदलाविरोधात कृतिशील होण्याचे आवाहन करू लागली. तिच्या बातम्या जगभर जात राहिल्या आणि तिला ओसंडून पाठिंबा मिळू लागला. ग्रेटा नामक बालिकेचे हवामानबदलाविषयीचे विचार ऐकण्यासाठी तिला जगभरातून आमंत्रणे येऊ लागली आणि तिच्या अंगी सात हत्तींचे बळ आले. पाहता पाहता नोबेलविजेते वैज्ञानिक, अर्थशास्त्रज्ञ, जागतिक पातळीवरील पर्यावरण संघटना व संस्था ग्रेटाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. एरवी भल्या भल्या शास्त्रज्ञ व पंडितांना न मोजणारे राजकीय नेते या बालिकेला आदराने ऐकू लागले. ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस, युरोपियन युनियनमधील सर्व राष्ट्रप्रमुख, उच्चपदस्थ नोकरशहा, उद्योगपती, वैज्ञानिक व पत्रकार तिची आवर्जून भेट घेऊ लागले. या सर्वाशी नम्रतापूर्वक, पण ठामपणे ग्रेटा संवाद साधू लागली