Google Doodle Viral Post : मल्याळम चित्रपटातील पहिल्या महिला अभिनेत्री पीके रोझी यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त गुगने एक खास डुडल बनवले आहे. पीके रोझी यांचा जन्म १० फेब्रुवारी १९०३ रोजी झाला होता. रोझी यांनी जेसी डॅनियल यांनी दिग्दर्शित केलेल्या विगाथाकुमारन (द लॉस्ट चाईल्ड) या चित्रपटात अभिनय केला. मल्याळम चित्रपट सृष्टीत अप्रतिम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या पीके रोझी यांना गुगलने डुडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. रोझी यांचा जन्म त्रिवेंद्रम येथील नंदनकोडे येथे राहणाऱ्या पुलाया कुटुंबात १९०३ मध्ये झाला होता.

बालपणापासूनच पीके रोझी यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. रोझी तरुण असतानाचा त्यांच्या वडीलांचे निधन झालं. रोझी यांनी अत्यंत गरीब परिस्थितीत आयुष्याची वाटचाल सुरु केली होती, असं त्यांचे नातेवाईक सांगतात. तरुण असतानाच रोझी यांनी चित्रपटसृष्टीत उमदा कलाकार म्हणून छाप टाकली. संगित क्षेत्रात आणि अभिनय क्षेत्रात रोझीनं नाव कमवावं, अशी तिच्या काकांची इच्छा होती. तिच्या काकांनी रोझीला अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन केलं. लहान असतानाच रोझी यांनी कक्कीरासी नट्टकम शाळेत शिक्षण घेतलं.

Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?

त्या काळात लोकांचा अभिनयक्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन काहिसा वेगळा होता. मात्र, पीके रोझी यांनी परिस्थितीला झुगारून अभिनयक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. महिलांना चित्रपटात अभिनय करण्याबाबत समाजाचा विरोध होता. कारण पीके रोझी यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांचं घर जाळण्यात आलं होतं.

नक्की वाचा – video: टर्कीच्या महाप्रलंयकारी भूकंपानंतर कुत्र्याच्या गोंडस पिल्लाला वाचवलं, तो क्षण पाहून थक्क व्हाल

इथे पाहा व्हायरल पोस्ट

घराला आग लावल्यानंतरही पीके रोझी डगमगल्या नाहीत, त्यांनी या गंभीर परिस्थितीवर मात करत पुढील मार्ग सुकर केला. रोझी स्वत:ला घडवण्यासाठी तामिळनाडूत गेल्या. पण त्यावेळी त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात एक मोठी आनंदाची घटना घडली. लॉरी ड्रायव्हर असलेल्या केशवन पिल्लईसोबत त्यांनी लग्नगाठ बांधली. त्या काळाता पीके रोझी यांना अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं म्हणून अनेक समाजकंटकांनी विरोध केला होता. समाजाने त्यांना एक अभिनेत्री म्हणून कधीच स्विकारलं नाही.

तरीही मल्याळम चित्रपटातील पहिली महिला अभिनेत्री म्हणून पीके रोझी यांची ओळख निर्माण झाली. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलने एक सुंदर डुडल शेअर करत ट्वीटरवर कॅप्शनही दिलं आहे. “आज पीके रोझी यांची जयंती असल्याने त्यांना गुगल डुडलच्या माध्यमातून मानवंदना देत आहोत. पीके रोझी या मल्याळम चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला अभिनेत्री होत्या.” गुगलने असं कॅप्शन ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टला दिलं आहे.