Viral Video : १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन्ही आपले राष्ट्रीय सण आहेत. हे दोन्ही दिवस संपूर्ण देशात उत्साहाने साजरे केले जातात. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण केले जातात. ठिकठिकाणी परेड, प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये शाळेतील मुलांची प्रभातफेरी दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचे शाळेचे दिवस आठवतील. तुम्ही कधी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारील प्रभातफेरीमध्ये सहभाग घेतला आहे का?

हा व्हायरल व्हिडीओ एका गावातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी दिसेल. विद्यार्थी देशभक्तीवर आधारीत घोषणाबाजी करत प्रभातफेरीमध्ये चालताना दिसत आहे. विद्यार्थी घोषणा देताना म्हणतात, “गंगा यमुना धो धो पाणी, हम सब हिंदूस्थानी” व्हिडीओ मध्ये तुम्हाला काही महिला शिक्षिका सुद्धा दिसतील. या व्हिडीओवर लिहिलेय, “१५ ऑगस्टला गावातून सकाळी काढली जाणारी प्रभातफेरी” ही प्रभातफेरी पाहून तुम्हाला तुमच्या शाळेची आठवण येईल. काही लोकांना शाळेचे दिवस आठवतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

equity mutual funds surge 3 percent in august
इक्विटी फंडात ऑगस्टमध्ये ३८,२३९ कोटींचा विक्रमी ओघ
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Readers reactions, Doctor, Readers,
पडसाद…
Indian Navy Recruitment 2024 Apply for SSR Medical Assistant Posts
Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मेडिकल असिस्टंट पदासाठी होणार भरती, ६९, १०० रुपयापर्यंत मिळू शकतो पगार
India b vs India b Shubma Gill Takes Stunning Catch of Rishabh Pant Catch Video
Duleep Trophy 2024: शुबमन गिलच्या कॅचची तुफान चर्चा, मागे धावत जात ऋषभ पंतच्या शॉट्चा टिपला अफलातून झेल, VIDEO व्हायरल
ITBP Constable Recruitment 2024 Registration for 819 posts begins on September 2, details here
ITBPमध्ये कॉन्सेटबलच्या ८१९ पदांसाठी होणार भरती, २ सप्टेंबरपासून अर्जप्रक्रिया सुरु, येथे पाहा अधिसूचना
Rohit Sharma Practice Session in Park in Abhishek Nayar Supervision Video Goes Viral
Rohit Sharma: ‘गार्डनमध्ये’ सराव करतोय रोहित शर्मा, कसोटी मालिकेसाठी अभिषेक नायरबरोबर हिटमॅनची जोरदार तयारी, VIDEO व्हायरल
Saturn nakshatra transit 2024
३ ऑक्टोबरपर्यंत शनी देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार धन-संपत्ती अन् प्रत्येक कामात यश

पाहा व्हायरल व्हिडीओ

kokancha_photowala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रभातफेरीला कोणकोण जायचं शाळेत” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.आरेबुद्रुक – रोहा ..कोकणधरतीवरील स्वर्ग म्हणजे कोकण. नमस्कार कोकणकरांनो, स्वर्गाहुन सुंदर आमचं कोकण. येवा कोकण आपलाच असा”

हेही वाचा : गणपती आगमन बघायला जाताय? काळाचौकीच्या महागणपती आगमनाला काय झालं पाहा; VIDEO पाहूनच धडकी भरेल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे फक्त आमच्यासारखे लोक समजू शकतात की गावाकडे १५ ऑगस्ट ला काय काय मज्जा असायची ती एक दिवस आधी १०/१५ ओळींचे भाषण पाठ करणे मग झोपण्यापूर्वी गणवेश धुवून त्याला कोळशाच्या इस्त्रीने इस्त्री करुन ठेवणे आणि केसांच्या रिबीन रोल करुन तांदळाच्या किंवा पिठाच्या डब्या खाली ठेवणे जेणेकरून त्या चुरगळल्या असतील तर व्यवस्थित होतील आणि सकाळ सकाळी लवकर उठून शाळेत जाऊन प्रार्थना करणे पाठ केलेल्या भाषणाचा सराव करुन एकमेकांशी भाषणाबद्दल बोलणे, रांगोळी काढणे आणि मग सर्व तयारी झाली की ध्वजवंदन करणे पाठ केलेली भाषण बोलणे मग पूर्ण गावातून प्रभात फेरी आणि ते नारे खरच आम्ही ९० मधली शेवटची पिढी आहोत ज्यांनी हे प्रत्यक्ष हे सुवर्ण आणि अविस्मरणीय दिवस पाहिलेत अनुभवलेत .जय हिंद जय भारत”
तर एका युजरने लिहिलेय, “सारे जहां से अच्छा हिन्दुस्तान हमारा , हम सभी हिन्दुस्तानी” आणखी एका युजरने लिहिलेय, “मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी होत चाललीय” एक युजर लिहितो, “गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी”