scorecardresearch

Premium

कॉंग्रेस की भाजपा सरकार कुणाचं? निकालाआधी समर्थकांनी लावली तब्बल १ लाखाची पैज, स्टॅम पेपरचा फोटो होतोय व्हायरल

निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात होताच प्रत्येक पक्षाचे समर्थक आपापली मतं मांडायला सुरुवात करतात.

MP Election 2023 Bet of 1 Lakh Rupees
समर्थकांनी लावली तब्बल १ लाखाची पैज. (Photo : X, Social Media)

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. निकालानुसार भाजपाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये एकतर्फी विजय मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मध्य प्रदेशात भाजपाने ज्या प्रकारे पुनरागमन केले आहे, त्यावरून शिवराजसिंह चौहान हेच ​​आजही जनतेची पहिली पसंती असल्याचे मानले जात आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात होताच कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकजण आपापली मतं मांडत असतो आणि निकालाचे विश्लेषण करत असतो. याच निवडणुकीचा भविष्यवाणीमुळे काही लोकांनी बक्कळ पैसे देखील कमावले आहेत. हो कारण काही लोकांनी आपल्या आवडीनुसार पक्ष आणि उमेदवारांवर पैज लावली होती. या पैजेतून छिंदवाडा जिल्ह्यातील नीरज मालवीय याने तब्बल एक लाख रुपये जिंकले आहेत.

Narendra Modi in convection
“काँग्रेसमध्ये दोन गट, पक्ष हताश झाल्याने…”, मोदींची टीका; म्हणाले, “देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी…”
Ghulam Nabi Azad slams congress
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर गुलाम नबी आझाद यांची टीका; म्हणाले, “काही अहंकारी…”
pm modi criticized only congress
लोकसभेतील भाषणात पंतप्रधान मोदींची केवळ काँग्रेसवर टीका; आगामी निवडणूक भाजपा विरुद्ध काँग्रेस करण्याचा प्रयत्न?
MAMATA BANERJEE AND RAHUL GANDHI
पश्चिम बंगालमध्ये जागावाटपावर अद्यापही तोडगा नाही, ममता बॅनर्जींची काँग्रेसवर टीका; म्हणाल्या, “काँग्रेस ४० जागांवरही…”

हेही पाहा – “देश देख रहा है, एक अकेला…” भाजपाच्या विजयानंतर सोशल मीडियावर PM मोदींचा ‘तो’ VIDEO तुफान व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक स्टॅम्प पेपरचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन जणांनी भाजपा आणि काँग्रेस यापैकी कोणाचा विजय होणार आणि कोणाचा पराभव होणार यावर १ लाखाची पैज लावल्याचं पाहायला मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यासाठी या लोकांनी ५० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर ५ साक्षीदारांसह ही पैज लावली आहे. प्रतिज्ञापत्रात एकाने काँग्रेस आणि दुसऱ्याने भाजपा राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे.

हेही पाहा- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींचा ‘तो’ जुना VIDEO व्हायरल, भाजपाचे नेते म्हणतायत, “राहुलजींची भविष्यवाणी…”

२२ नोव्हेंबर रोजी छिंदवाडा जिल्ह्यातील नीरज मालवीय आणि धनीराम भलावी यांच्यात १ लाख रुपयांची पैज लागली होती. माजी सरपंच असलेल्या भालवी यांना मध्य प्रदेशात काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल असा विश्वास होता, तर नीरज मालवीय नावाच्या व्यक्तीने भाजपा सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. व्हायरल प्रतिज्ञापत्रात नीरज मालवीय आणि धनीराम भलावी यांनी चेकवर सह्या करून तो स्टॅम पेपर साक्षीदार अमित पांडे यांच्याकडे जमा केल्याचं दिसत आहे. अटींनुसार, दोघांमध्ये जो विजयी होईल त्याला अमित पांडेकडून चेक मिळणार असा ठराव करण्यात आला होता.

तर आता नीरज नावाच्या व्यक्तीने ही पैज जिंकली असून या स्टॅम पेपरचा फोटो एक्स (ट्विटर) वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय नेटकरी या फोटोच्या खाली वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असल्याचंही पाहायला मिळत आहे. तसेच निवडणुकीच्या निकालामुळे एका व्यक्तीने लाख रुपय कमावल्याच्या प्रकरणाची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Whose government congress or bjp before the mp election result the supporters bet as much as 1 lakh the photo of the stamp paper is going viral jap

First published on: 04-12-2023 at 12:33 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×