scorecardresearch

विमानातील दोन वैमानिकांना का दिले जाते वेगवेगळे अन्न? यामागे आहे रंजक कारण

विमानात दोन वैमानिक असण्यामागे प्रवाशांची सुरक्षा हे मुख्य कारण असते. या दोन वैमानिकांना नेहमी वेगवेगळे जेवण दिले जाते. त्यांना कधीही एकसारखे जेवण दिले जात नाही.

विमानातील दोन वैमानिकांना कधीही एकसारखे जेवण दिले जात नाही. (Photo : Pixabay)

विमान उडवण्यासाठी दोन वैमानिक असतात. दोन वैमानिक असण्यामागे प्रवाशांची सुरक्षा हे मुख्य कारण असते. परंतु, तुम्हाला हे माहित नसेल की या दोन वैमानिकांना नेहमी वेगवेगळे जेवण दिले जाते. त्यांना कधीही एकसारखे जेवण दिले जात नाही. याच्या मागे अत्यंत रंजक कारण आहे.

१९८४ साली एक कॉनकॉर्ड सुपरसॉनिक फ्लाइट लंडनवरून न्यूयॉर्कला जात होती. या फ्लाइटमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली. या विमानातून एकूण १२० प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना एकच जेवण देण्यात आले होते. त्या जेवणात काहीतरी गडबड होती, ज्यामुळे सर्वांनाच अन्नातून विषबाधा झाली. यानंतर सर्व लोकांना उलट्या, ताप आणि जुलाब झाला. विषबाधा झाल्याने एका प्रवाशाचाही मृत्यू झाला.

नोकरी असावी तर अशी! ‘ही’ व्यक्ती घरबसल्या कार्टून बघण्याचा घेते लाखो रुपये पगार

या फ्लाइटच्या दोन्ही वैमानिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अशा घटना टाळण्यासाठी आता अत्यंत सावध पावले उचलली जात आहेत. त्यामुळे एकाच विमानाच्या वैमानिक आणि सहवैमानिकाला सारखे जेवण दिले जात नाही आणि दोघांनाही वेगवेगळे अन्न दिले जाते. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असली तरी दोन्हीपैकी किमान एक वैमानिक सुरक्षित असला पाहिजे, जेणेकरून तो प्रवाशांना सुखरूप नेऊ शकतो.

आता सहसा पायलटला प्रथम श्रेणीचे जेवण दिले जाते आणि सह-वैमानिकाला बिझनेस क्लासचे जेवण दिले जाते. अनेक विमान कंपन्या कॉकपिट क्रू मेंबर्ससाठी वेगळे जेवण बनवतात. या विमान कंपन्या त्यांचे जेवण वैमानिक आणि सहवैमानिकांना स्वतंत्रपणे देतात, जे प्रवाशांच्या जेवणापेक्षा वेगळे असते. हे अन्न अगदी साधे असते. २०१२ मध्ये सीएनएनने कोरियन पायलटची मुलाखत घेतली. यामध्ये पायलटने असे सांगितले होते की, अन्नातून विषबाधा होण्यापासून बचाव करण्यासाठी दोन्ही वैमानिकांना वेगळे अन्न दिले जाते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why are two pilots given different food interesting reason behind this pvp

ताज्या बातम्या