गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेवरून वाद होत आहे. एअरटेलच्या सर्व्हिस सेंटरमध्ये किंवा डीमार्टमध्ये हिंदी भाषिकांना मराठी बोलण्याचा आग्रह केला जातो. काही दिवसांपूर्वी डिलिव्हरी बॉयने मराठी भाषा बोलत नाही म्हणून त्याचे पैसे न दिल्याचा प्रकार समोर आला होता. अनेकदा हिंदी भाषिकांवर मराठी बोलण्याची सक्ती केली जाते ज्याला ते तीव्र विरोध करताना दिसतात. या व्हिडीओमध्ये मराठी भाषा वादाच्या भोवऱ्यात अडकली पाहिजे. दरम्यान आता आणखी एका व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे ज्यामध्ये मुंबई लोकलमध्ये संतापलेल्या मराठी माणसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ जुना असल्याचे सांगितले जात आहे.
व्हिडीओमध्ये एक मराठी माणूस संतापलेला दिसत आहे. मुंबईतील मराठी माणूस कसा जागा झाला पाहिजे याबाबत तो तावातावाने बोलत आहे. तसेच मराठी कुटुंबाने मासंहार करण्याबाबत आक्षेप घेतला जातो तेव्हा मराठी माणसाने काय करावे याबाबत तो सांगत आहे. एवढंच नाही तर त्या मराठी माणसाने पंतप्रधान मोदींचे नाव घेत धमकी दिल्याचे दिसत आहे.
व्हिडीओमध्ये तो व्यक्ती म्हणत आहे की, “रोकडा मांगोगे तो फाफडा देंगे, मुंबई मांगोगे तो झापडा देंगे. जरी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तरी गुजरात्यांनी आवाज करू नये. आम्ही मांसहार करू, मटण खाऊ, चिकन खाऊ, मासे खाऊ….जर त्याला विरोध केला तर त्याच्या घरामध्ये जाऊन फेकू. मांसाहार तुम्ही खाऊ नका.”
व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एकाने कमेंट करत म्हटले की, “अगदी बरोबर आहे. प्रत्येक मराठी माणसाने असेच केले पाहिजे,”
दुसऱ्याने म्हटले की, “अगदी बरोबर, जय महाराष्ट्र”
तिसरा म्हणाला की, मराठी माणसाला! महाराष्ट्रात फक्त मराठी माणसांची दादागिरी चालणार.
चौथा म्हणाला की, “आजपर्यंत मराठी माणसाने सहन केला आहे पण देणाऱ्याचे हात घ्यायला जाल तर त्याच हातांनी मुस्काट फोडलं जाईल, जय महाराष्ट्र.”
पाचवा म्हणाला की, “खुप छान काका, मराठी माणसाची अशीच ताकद असली पाहिजे”
आणखी एकाने म्हटले की, मी मराठी आहे आणि शुद्ध शाकाहारी हिंदू आहे. जय महाराष्ट्र! महाराष्ट्रमध्ये परप्रांतीय लोकांनी दादागिरी करु नये. मी पण कित्येक वेळा गुजरात, ओडिसा, आंध्र प्रदेश तेलंगणा तमिळनाडू झारखंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रहायला गेलो. मी तर कधी दादागिरी केली नाही परराज्यात. तिथे त्यांचा आदर ठेवला. भाषा. खानपान, वस्त्र, संस्कृती इत्यादी,… यांना महाराष्ट्रमध्ये येऊन काय माज येतो.
यापूर्वीही मुंबई लोकलमध्ये संतापलेल्या मराठी माणसाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. महाराष्ट्र मराठ्यांचा आहे. मुंबई मराठ्यांची आहे असे सांगत तो व्यक्ती संताप व्यक्त करत होता.
टीप : वरील व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकसत्ता या व्हिडीओची पुष्टी करत नाही.