Why Radhika Merchant left America : अंबानी कुटुंबाची सर्वात छोटी सुन राधिका मर्चेंट ही सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. न्यूयॉर्क युनिवर्सिटीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकामध्ये करिअर घडवण्याऐवजी भारतात परत येण्याचा निर्णय का घेतला याबाबत एका पॉडकास्टमध्ये राधिका अंबानी मर्चेंटने खुलासा केला.

मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीची पत्नी राधिका मर्चेंटने सांगितले की, जेव्हा ती अमेरिकामध्ये शिक्षण घेत होती तेव्हा ट्रंप राष्टपती होणार होते. निवडणूका सुरु होत्या, त्या काळात तिथे राजकिय आणि सामाजिक पातळीवर मोठी उलथापालथ सुरू होती. तर दुसरीकडे भारतामध्ये विकास वेगात होत होता आणि देशाच्या भविष्याबाबत सकारात्मक वातवरण दिसत होते.

भारतात अनेक संधी

राधिकाने सांगितले की, “त्यावेळी भारतात भाजपला भक्कम जनतेचा पाठींबा मिळाला होता. आधार, यूपीआय आणि जिओसारख्या डिजिटल क्रांतीने देशाला एक नवी दिशा दिली.”

राधिकाच्या मते, त्यावेळी भारताचा आर्थिक विकास दर ८.५ टक्के होता, जो अमेरिकेपेक्षा खूपच चांगला होता. त्यावेळी अमेरिकेचा विकास दर २-३ टक्के होता, त्यामुळे त्यांना वाटले की, भारतात प्रचंड क्षमता आहे.”

राधिकाने सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकामध्ये आले होते आणि मॅडिसन स्क्वेअर पार्कमध्ये झालेल्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर माझ्या मनात भारतात परत जाण्याचे विचार आणखी दृढ झाले. त्या कार्यक्रमात मला भारताच्या उज्वल भविष्य आणि विकासाची नवे चित्र दिसले होते.”

‘इमोशनल इंफ्रास्ट्रक्चर’

अंबानी कुटुंबाच्या सुनेने ‘‘इमोशनल इंफ्रास्ट्रक्चर’’चा उल्लेख केला आणि सांगितले की, कुटुंब, समाज आणि आपल्या लोकांचा पाठिंबा हीच व्यक्तीची सर्वात मोठी ताकद असते. केवळ रस्ते आणि रेल्वेसारख्या भौतिक सुविधाच नव्हे, तर आपल्या देशाशी आणि समाजाशी असलेले नातेही जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते.

राधिका मर्चंट म्हणाली की, माझा भारतात परतण्याचा निर्णय केवळ करिअर आणि आर्थिक संधींशी संबंधित नव्हता, तर देशासाठी काहीतरी करण्याच्या जबाबदारीच्या भावनेतूनही होता. आपल्या देशाच्या विकासात योगदान देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.”

आर्थिक स्वातंत्र्याबद्दल काय म्हणाली राधिका मर्चेंट

आर्थिक स्वातंत्र्याबद्दल बोलताना राधिका म्हणाली, तुम्ही कोणाची मुलगी आहात, कोणाची पत्नी आहात, तुम्ही तुमचे आयुष्य किती आरामात जगता, याने काही फरक पडत नाही. स्वतःचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असायला हवे. जर आपण महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ दिले नाही, तर आपण आपल्या समाजात पूर्ण लैंगिक समानता कधीच साध्य करू शकणार नाही.

राधिकाचे हे वक्तव्य आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले असून, अनेक लोक तिच्या भारतात परतण्याच्या निर्णयाचे कौतुक करत आहेत.