Tiger Day 2022 : आज संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जात आहे. वाघांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या नामशेष होणाऱ्या प्रजातींना वाचवण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. २०१० पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. रशियातील पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत दरवर्षी २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत वाघांची संख्या असलेले १३ देश सहभागी झाले होते. प्रत्येकाने २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले होते. चांगली गोष्ट म्हणजे भारताने २०१८ मध्येच हे लक्ष्य गाठले होते. २०१८ मध्ये भारतात वाघांची संख्या २९६७ च्या वर गेली होती. जागतिक वन्यजीव निधीनुसार, गेल्या १५० वर्षांत वाघांची संख्या सुमारे ९५ टक्क्यांनी घटली आहे.

survey of disabled in maharashtra,
राज्यात अपंगांच्या सर्वेक्षणाला तीस वर्षांनंतर मिळाला मुहूर्त
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या
loksatta analysis midcap and smallcap stocks surged
विश्लेषण: सरत्या वर्षात शेअर बाजारात तेजीच तेजी… ‘स्मॉल कॅप’ ठरले छोटे उस्ताद! तेजीचे आणखी कोण भागीदार?

Optical Illusion: ‘या’ फोटोमध्ये लपला आहे वाघ; तुम्हाला सापडला का?

गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची थीम होती – “त्यांचे जगणे आपल्या हातात आहे.” यावर्षी थीम जाहीर करण्यात आली नाही. या दिवशी वाघांच्या संवर्धनासंबंधी चर्चासत्र आयोजित केले जातात. जेणेकरून लोकांना यासंबंधी अधिकाधिक माहिती मिळेल. याशिवाय वाघांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांना देणगीही दिली जाते.

पाहा व्हिडीओ –

भारत सरकारने सांगितले की, देशात गेल्या तीन वर्षांत शिकार, नैसर्गिक आणि अनैसर्गिक कारणांमुळे ३२९ वाघांचा मृत्यू झाला. याच काळात शिकारी, विजेचा धक्का, विषारी पदार्थ सेवन आणि रेल्वे अपघात यामुळे ३०७ हत्तींचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार यांनी २६ जुलै रोजी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

‘मला या जगात का आणलंय?’ लहानग्याचा वैताग पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू; हा Viral Video पाहाच

त्यांनी सांगितले की २०१९ मध्ये ९६ वाघ, २०२० मध्ये १०६ आणि २०२१ मध्ये १२७ वाघांचा मृत्यू झाला. दिलेल्या माहितीनुसार, ६८ वाघांचा नैसर्गिक कारणाने, पाच अनैसर्गिक कारणांमुळे आणि २९ वाघांचा शिकारीमध्ये मृत्यू झाला. त्यांनी उत्तरात सादर केलेल्या आकडेवारीनुसार, शिकारीच्या प्रकरणांची संख्या २०१९ मध्ये १७ वरून २०२१ मध्ये चारवर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधीत वाघांच्या हल्ल्यात १२५ लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी महाराष्ट्रात ६१ आणि उत्तर प्रदेशात २५ जणांचा मृत्यू झाला.