केरळमधील 'या' मंदिरात महिलांप्रमाणे साडी नेसून शृंगार करतात पुरुष ( photo ; Kerala Tourism/ Ananth Rupanagudi twitter)
Kerala Unique Ritual: भारतात असंख्य सण साजरे केले जातात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये, धर्म आणि समुहांचे सण देखील वेगवेगळे असतात. यापैकी मोठ्या सणांमध्ये सर्वसाधारणपणे लोक नवीन कपडे परिधान करुन साजरा करतात. महिला साडी नेसतात आणि पुरुष धोतर/ लूंगी असे पांरपारिक कपडे परिधान करतात. पण तुम्ही कधी अशा सणाबद्दल ऐकलं आहे का, ज्यामध्ये पुरुष साडी नेसून तयार होतात आणि विधींमध्ये सहभागी होतात.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटत असेल पण हेच सत्य आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये असा सण आहे ज्यामध्ये पुरुष महिलांसारखे कपडे परिधान करुन, शृंगार करुन सहभागी होतात. या सणाचे नाव चमायाविलाक्कू उत्सव आहे. भारतीय रेल्वेमधील एक अधिकारी अनंत रुपनगुडी यांनी या सणामध्ये महिलेच्या वेषात सहभागी झालेल्या एका पुरुषाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल. तुम्हाला हा फोटो पाहून विश्वास बसणार नाही की, फोटोमधील व्यक्ती स्त्री नव्हे तर पुरुष आहे.
The Devi Temple in Kottamkulakara in Kollam district in Kerala has a tradition called the Chamayavilakku festival.
This festival is celebrated by men who are dressed as women. The above picture is that of the man who won the first prize for the make up In the contest. #festivalpic.twitter.com/ow6lAREahD
अनंत रुपनगुडी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, “केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील कोट्टमकुलकारा येथील देवीच्या मंदिरात चामयाविलक्कू उत्सव नावाची परंपरा आहे. हा सण पुरुषांद्वारे साजरा केला जातो. यामध्ये पुरुष महिलांचे रूप धारण करतात. ते महिलांचे कपडे परिधान करतात आणि त्यांच्यासारखा सर्व शृंगार करतात. हे फोटो त्या व्यक्तीचे आहे ज्याने या महोत्सवात भाग घेतला आणि स्पर्धेतील मेकअपसाठी प्रथम पारितोषिक जिंकले.”
केरळ पर्यटन वेबसाइटनुसार, या उत्सवाला कोट्टनकुलंगारा चमायाविलक्कू म्हणतात, ”दिव्यांचा आनंदोत्सव आणि हा मल्याळम महिन्याच्या 10व्या आणि 11व्या दिवशी, मीनम, मार्चच्या उत्तरार्धात साजरा केला जातो. या उत्सवात महिलांच्या वेशभूषेत पुरुषांच्या हातात दिवे देऊन मिरवणूक काढली जाते. राज्यभरातील पुरुष साडी नेसतात, दागिन्यांनी शृंगार करतात आणि मेकअप करतात आणि या अनोख्या विधीत भाग घेतात.
कोट्टनकुलंगारा चमायाविलक्कू या उत्सवात महिलांच्या वेशभूषेत पुरुषांच्या हातात दिवे ठेवून मिरवणूक काढली जाते (photo Credit: Kerala Tourism)
सर्वात जास्त तृतियपंथी समुहाचे लोक येतात एकत्र
केरळ पर्यटन वेबसाईटनुसार, महिलांंसारखे कपडे परिधान करण्याच्या उत्सवात पुरुष चमायाविलक्कू ( (पारंपरिक दिवा) घेतात आणि प्रमुख देवतेवरील त्यांच्या भक्तीचे प्रतीक म्हणून आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मंदिराभोवती फिरतात. सध्या, हा सण केरळमधील तृतियपंथी समुहाचा सर्वात मोठा मेळावा झाला आहे कारण हा सण त्यांना त्यांची ओळख साजरी करण्यासाठी एक हक्काची जागा देतो.
Would love to see their real self ?? ??if you hadn't explained then I certainly wouldn't have believed it. All are so beautiful ❤️ in their female version.
अनंत रुपनगुडी यांनी सोमवारी ही पोस्ट ट्विट केली. आतापर्यंत याला 2,800 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मोठ्या संख्येने लोक ते शेअर आणि रिट्विट करत आहेत. त्याच वेळी, फोटो पाहून आश्चर्यचकित झालेले अनेक लोक आहेत.
एका ट्विटर यूजरने लिहिले की, “मी कधीच अंदाज लावू शकलो नसतो. पहिल्यांदा हे अविश्वसनीय आहे, परंतु जसे मी अधिक वाचले ते खरे आहे आणि जुन्या परंपरेचे पालन करतात. हा उत्सव दरवर्षी 25 मार्च रोजी केरळमधील कोल्लम येथे साजरा केला जातो.”