Indian Railway Viral Video : आयुष्यात आनंद विकत घेता येत नाही; तो अगदी लहान लहान गोष्टीतूनही मिळतो, असे म्हटले जाते; पण आनंदी आयुष्य जगण्यासाठी पैसाच गरजेचा असतो. आपण कितीही म्हटलं तरी आयुष्यातील चांगल्या गरजा पूर्ण करण्यासाठी हल्ली पैसाच गरजेचा आहे. चांगलं खाणं, राहणं आणि एकूणच सुखी आयुष्य जगणं यांसाठी आजच्या जगात पैशाची तीव्र गरज असते. सध्या सोशल मीडियावर भारतीय रेल्वेतील प्रवासाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातून आपल्याला एक मोलाचा धडा मिळतोय.

रेल्वेने रोज लाखो प्रवासी प्रवास करतात; पण प्रत्येकाच्या प्रवासाची स्थिती वेगळी असते. पैसा असणारा फर्स्ट क्लास एसी ट्रेनमधून प्रवास करतो; पण ज्याच्याकडे नाही, तो धक्के खात सेकंड क्लास डब्यातून उभं राहूनचं आपलं ठिकाण गाठतो. हाच फरक या व्हिडीओतून दाखविण्यात आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ ट्रेनच्या आतून रेकॉर्ड करण्यात आला आहे.

आयुष्यात भरपूर पैसे कमावणे का महत्त्वाचे आहे? पाहा VIDEO

व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे लोक दिसतील. एक म्हणजे जे फक्त स्वतःचा उदरनिर्वाह करण्यापुरते कमावतात आणि दुसरे म्हणजे जे भरपूर पैसे कमावतात. व्हिडीओ पाहूनच आयुष्यात भरपूर पैसे कमावणे का महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होते.

हा व्हिडीओ प्रत्यक्षात ट्रेनच्या एसी कोचमधून रेकॉर्ड करण्यात आला आहे, जिथे लोक आरामात बसलेले दिसत आहेत. तर त्याच क्षणी विरुद्ध ट्रॅकवरून जाणारी दुसरी ट्रेनही दिसते, जिथे काही लोक गेटवर उभे आहेत, तर इतर सामान्य सीटवर बसून प्रवास करत आहेत. अनेकांना तर ट्रेनमध्ये बसण्यासाठी सीट्स नाहीत. त्यामुळे उभं राहून प्रवास करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. जर त्यांच्याकडे पुरेसे पैसे असते, तर तेही एसी कोचमधून प्रवास करू शकले असते. हा व्हिडीओ असा मेसेज देतो की, जीवनात पैसे कमावणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

रेल्वे प्रवासाचा हा व्हिडीओ @_vatsalasingh नावाच्या एक्स अकाऊंवरुन पोस्ट करण्यात आला आहे. जो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट केली की, आजकाल तुमच्याकडे पैसा असेल, तर तुमच्याकडे सर्व काही आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “कोणीही आनंदी नाही. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणावरून रडत आहे. आपण फक्त ते बाहेरून पाहतो.”