पुण्यात काल रात्रीपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. धो-धो पाऊस कोसळत आहे. नदीपात्रातील रस्ता आणि भिडे पुल पाण्याखाली गेला आहे. पुण्यातील पावसाची भयावह स्थिती दर्शवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अनेक वाहने अडकल्याचे व्हिडिओ समोर येत आहे. दरम्यान पुराच्या पाण्यात कार घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुदैवाने स्थानिक लोकांनी त्याची मदत केली. हेही वाचा - पुण्यातील ऐतिहासिक पेशवे कालीन कात्रजचा तलाव ओव्हरफ्लो; पाहा Viral Video व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये आपली कार उतरवताना दिसत आहे. आसपासचे लोक त्याला कारमधून बाहेर येण्यास सांगत आहे. एक व्यक्ती जोरजोरात ओरडत आहे की, "ए बाहेर ये, दार उघड समोर खड्डा आहे."व्यक्तीची कार अक्षरश: पाण्यात बुडणार तेवढ्यात आसपासचे लोक त्याला कारमधून ओढून बाहेर काढतात. कार बुडायला आली तरी तो व्यक्ती बाहेर येत नव्हता हे पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. लोक मदतीला धावून आले नसते तर त्या व्यक्तीने नाहक जीव गमावला असता. हेही वाचा - Video: “लग्नाचं टेन्शन नको घेऊ, सरकारला विनंती करू…” लाडकी बहीण, लाडका भाऊनंतर लग्नाळू लोकांची अजब मागणी, पोस्टर चर्चेत व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कारचालकाची मदत करणाऱ्यांचे कौतूक केले. व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने व्हिडीओवर कमेंट करत सांगितले की, "हा व्हिडिओ पिंपरी चिंचवडमधील चऱ्होळी बुद्रुक या गावातील आहे आणि या लोकांनी ज्याला वाचावले त्या व्यक्तीचे नाव योगेश भाऊ भोसले आहे" दुसरा म्हणाला, "जीवापेक्षा गाडी महत्त्वाची आहे." तिसरा म्हणाला तर,"माणसाला फक्त माणूसच वाचवू शकतो"