scorecardresearch

VIRAL : पती, पत्नी और वो! एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात होता नवरा, मग बायकोने दोघांचं लग्न लावलं आणि आता…

थोड्या वेळासाठी तुम्हाला ही कहाणी अभिनेता सलमान खान, अजय देवगण आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातली वाटू शकते. पण हे खरंय

VIRAL : पती, पत्नी और वो! एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात होता नवरा, मग बायकोने दोघांचं लग्न लावलं आणि आता…
(Photo: Twitter/ khaarbeqaraar)

Wife Gets Her Husband Married To His Lover : पती-पत्नीच्या नात्यात ‘तो’ किंवा ‘ती’ म्हणजे तिसरी व्यक्ती आली तर दोघा पती-पत्नीच्या नात्यात फूट पडतेच. बरेच लोक लग्नाआधी कोणाच्या तरी प्रेमात असतात, पण त्यांना काही कारणामुळे लग्न करता येत नाही. वैवाहिक जीवनातील काही लोक आपलं जुनं प्रेम विसरून नवीन म्हणजेच पती-पत्नीसोबत आयुष्याचा प्रवास पूर्ण करतात. परंतु काही लोक लग्नानंतरही जुन्या प्रेमाला विसरत नाहीत आणि त्यांच्याच प्रेमात राहतात. सोबतच ते लग्न केलेल्या जोडीदाराची फसवणूक करतात. यामुळे अनेकांचं वैवाहिक जीवनही विस्कळीत होतं. सध्या अशाच एक अजब लग्नाची गोष्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मात्र हे प्रकरण काहीसं वेगळं आहे.

बायकोने स्वतः आपल्या नवऱ्याचं लग्न त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडसोबत लावून दिलं, असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. थोड्या वेळासाठी तुम्हाला ही कहाणी अभिनेता सलमान खान, अजय देवगण आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातली वाटू शकते. पण हे खरंय. बॉलिवूडच्या चित्रपटाप्रमाणेच एका पत्नीने आपल्या पतीचं लग्न त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत लावून दिलं. इतकंच नव्हे तर ती स्वतः त्या दोघांच्या लग्नात सहभागी देखील झाली. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : वाघ जेव्हा भडकलेल्या वाघिणीसमोर उंदरासारखा होतो तेव्हा…

हे प्रकरण आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील आहे. डक्कली येथील आंबेडकर नगर येथील रहिवासी असलेला कल्याण हा युट्यूब आणि शेअर चॅटवर खूप लोकप्रिय आहे. त्याची सोशल मीडियावर फॅन फॉलोइंगही मोठ्या प्रमाणात आहे. काही वर्षांपूर्वी कल्याणला विमला भेटली. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि नंतर लग्न झाले. कल्याण आणि विमला मिळून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ बनवू लागले.

आणखी वाचा : Facts About Indian Railway: भारतीय रेल्वेशी संबंधित ‘या’ गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील!

काही वर्षांनी त्यांच्या नात्यातला गोडवा नाहीसा होऊ लागला. खरं तर, या कथेत विशाखापट्टणममधील नित्याश्री नावाच्या मुलीची एन्ट्री झाली होती. ती सुद्धा सोशल मीडियावर व्हिडीओ बनवत असे. कल्याण आणि नित्याचे नाते काही वर्षांपूर्वीच तुटलं होतं. यानंतर कल्याणने विमलासोबत लग्न केलं. मात्र जेव्हा नित्याला या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा ती त्याच्या घरी पोहोचली.

आणखी वाचा : सेम टू सेम लहान बाळासारखा रडतो हा पक्षी, VIRAL VIDEO पाहूनही तुमचा विश्वास बसणार नाही!

जेव्हा नित्याश्रीला कळलं की कल्याण विवाहित आहे, तेव्हा तिने विमलाकडे कल्याणसोबत लग्न करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली. ते तिघेही एकाच छताखाली राहतील असा प्रस्तावही त्या दोघांनी विमलाकडे मांडला. या सगळ्या गोष्टीवर विचार करून विमला हिने त्यांच्या प्रस्तावाला होकार दिला आणि सर्व पारंपारिक रितीरिवाजांसह एका मंदिरात नित्यश्रीचा विवाह तिच्या पतीसोबत पार पाडला. तिघांनीही फोटो काढले जे सोशल मीडियावर व्हायरल झाले.

अशी कहाणी तुम्ही आतापर्यंत चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये पाहिली असेल. पण प्रत्यक्ष जीवनात अशी कहाणी घडल्याचं हे पहिल्यांदाच समोर आलं आहे. सोशल मीडियावर नेटकरी सध्या या अजब लग्नाच्या गजब गोष्टींवर आपले विचार मांडताना दिसत आहेत. त्यामुळे हे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या