scorecardresearch

‘बायको विकणे आहे’; ब्रिटनच्या पतीने पत्नीला विकण्यासाठी जारी केली जाहिरात; म्हणाला…

पतीने त्याच्या पत्नीला खरेदी करण्याचे फायदे आणि तोटेही सांगितले. यासोबतच तिचा फोटोही पोस्ट केला आहे.

wife for sale
या माणसाने इंटरनेटवर 'वाइफ फॉर सेल' या नावाने पोस्ट करत बायकोची तुलना जुन्या कारशी केली.(प्रातिनिधिक फोटो : Pexels)

ब्रिटनमध्ये एक विवाहित जोडपे राहते. एकदा पत्नी सुट्टी घालवण्यासाठी मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर गेली होती. त्यानंतर पतीने सोशल मीडियावर पत्नीसाठी धक्कादायक जाहिरात दिली. त्या माणसाने इंटरनेटवर ‘वाइफ फॉर सेल’ या नावाने पोस्ट करत तिची तुलना जुन्या कारशी केली.

‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या रिपोर्टनुसार, रॉबी मॅकमिलन असे या व्यक्तीचे नाव आहे. तो व्यवसायाने डीजे आहे. पत्नी साराचा फोटो फेसबुकवर शेअर करत त्याने एक मजेशीर पोस्ट लिहिली. यामध्ये त्याने साराला खरेदी करण्याचे फायदे आणि तोटेही सांगितले. यासोबतच पत्नीचा फोटोही पोस्ट केला आहे.

साराची कारशी तुलना करताना रॉबीने पोस्टमध्ये लिहिले की, साराची स्थिती सरासरीपेक्षा जास्त आहे. त्याचे टायर चांगले आहेत. तिचे १०० जोडे सोबत मिळतील. रोज सकाळी तिच्या एक्झॉस्टमधून दुर्गंधी येते, पण खिडकी उघडताच ती निघून जाते. ती कॉरोस लाईट आणि कॉकटेलवर धावते आणि प्रत्येक गॅलन ड्रिंकवर चांगले स्माईल देते.

अख्ख्या शाळेत दोन तरुणांनी पेंट करून लिहिलं ‘सॉरी’; पोलिसांकडून शोध सुरू

रॉबीने सांगितले की, आम्ही जवळपास २० वर्षांपासून एकमेकांसोबत आहोत आणि आम्हाला एकमेकांची चांगलीच सवय झाली आहे. तो म्हणाला की, जाहिरातीनंतर मला साराच्या विक्रीच्या काही ऑफर आल्या आहेत, पण दुर्दैवाने ती आता मार्केटमधून बाहेर आहे. रॉबी म्हणाला की तो तिला कधीच विकणार नाही, ती लाखात एक आहे.

हे जोडपे एसेक्सचे आहेत, परंतु आता पोर्तो रिको डी ग्रॅन कॅनरिया येथे राहतात आणि दोन मुलांचे पालक आहेत. रॉबीच्या या पोस्टला शेकडो लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्स मिळाल्या. स्वत: सारानेही या पोस्टवर कमेंट केली आहे. सारा म्हणाली की रॉबी खूप खोकर आहे. मी पोस्ट पाहिल्यावर मला हसू आले, कारण तो नेहमीच अशा खोड्या करतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wife is for sale advertisement issued by british husband pvp

ताज्या बातम्या