एक माकड कधी काय करेल सांगता येत नाही. जर ते पिसाळलेलं असेल तर लोकांना इतके हैराण करु शकते की लोकांना घराबाहेर पडणे अवघड होते. ते माकड लोकांना सळो की पळो करुन हैदोस घालू शकते. ज्यांनी कधी अशाप्रकारच्या माकडाचा अनुभव घेतला असेल त्यांना यावर पटकन विश्वास बसेल. सध्या सोशल मीडियावर अशाच एका माकडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, यात एका माकडाने प्रवाशांनी भरलेली संपूर्ण बसमध्ये असा काय राडा घातली की संपूर्ण बस रिकामी करावी लागली.
यातील मजेशीर गोष्ट म्हणजे बसमध्ये माकड शिरल्याबरोबर कंडक्टरने सर्वात आधी खाली उतरुन पळ काढला. यानंतर माकडाने प्रवाशांना त्रास देण्यास सुरुवात केली. उत्तरप्रदेशातील दुबग्गा सीतापूर बायपासजवळील लखनऊ सिटीजवळ उभ्या असलेल्या बसमध्ये ही मजेशीर घटना पाहायला मिळाली. बस ड्रायव्हर आणि कंडक्टर बस भरण्याची वाट बघत थांबले असताना अचानक एक माकड बसमध्ये शिरले आणि त्याने हैदोस घालण्यास सुरुवात केली. माकडाच्या त्रासामुळे प्रवासी एक-एक करुन खाली उतरु लागले.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माकड प्रवासी बसमध्ये शिरुन प्रवाशांना त्रास देताना दिसत आहे. ज्यामुळे प्रवासी एक – एक करुन बसखाली उतरतात. यात सर्वात आधी बसमधून कंडक्टर बाहेर येऊन उभा असलेल्याचेही दिसतेय. पण इतर प्रवासी माकड बाहेर जाण्याची वाट पाहत बसमध्येच बसून राहतात, अशावेळी माकड एका वृद्ध प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन बसते. वृद्धाच्या डोक्यावर माकड जाऊन बसताच इतर प्रवासी घाबरुन हळूहळू बस घालून उतरतात, अशाप्रकारे एका माकडामुळे संपूर्ण बसचं रिकामी होते.
बसमध्ये हैदोस घालणाऱ्या या माकडाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटिझन्स सुद्धा जोरदार कमेंट्स करत आहेत.
