Hippo Funny Video Viral : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ शिकारीचे असतात जे फारच भयानक असतात, तर काही मजेशीर असतात, ज्यात प्राणी काहीतरी कारनामे करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका पाणघोड्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला हसू आवरणं कठीण होईल. या व्हिडीओत एक महिला पाणघोड्याला कलिंगड खायला देत असते, पण हे करत असताना कलिंगड पाण्यात पडतो, हे पाहून पाणघोडा चिडतो आणि असं काही करतो की पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

व्हिडीओत महिलेला पाणघोड्याला कलिंगड खायला घालण्याचा प्रयत्न कसा महागात पडला हे दिसतेय. यावेळी तो पाणघोडा तिच्याकडे अशी काय नजर टाकतो की तुम्ही पण पाहून हसाल.

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता, एक महिला कार थांबवून पाणघोड्याला कलिंगड खाऊ घालण्याचा प्रयत्न करते. यावेळी पाणघोडाही आपले गुहेसारखे मोठे तोंड पूर्ण उघडून फेकलेलं कलिंगड तोंडात पडेल याची वाट बघत असतो. पण, महिलेचा नेम चुकतो आणि कलिंगड पाणघोड्याच्या जबड्यात न पडता थेट नदीत पडते.

पाणघोड्याची रिअॅक्शन पाहून तुम्हीही हसाल

कलिंगड पाण्यात पडताच पाणघोड्याने अशी काही रिअॅक्शन दिली की पाहून तुम्ही हसाल. त्याने उघडलेलं तोंड बंद केलं आणि त्या महिलेकडे एकाच डोळ्याने अशी काही नजर दिली की, जणू काही तो म्हणत होता, तुला दिसत नाही का माझं एवढं मोठं तोंड, मला बाहेर भेट, बघतो मग.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, ती महिला आपली चूक सुधारण्यासाठी म्हणून लगेच दुसरा कलिंगडही पाणघोड्याला खाण्यासाठी म्हणून फेकते. पण, पाणघोडा भलताच रागावला होता, त्याला इतका राग आला होता की त्याने दुसऱ्या कलिंगडकडे ढुंकूनही पाहिले नाही, पण त्याने त्या महिलेकडे रागीट नजरेने पाहणेही थांबवले नाही, तो एकटक त्या महिलेकडे रागाने पाहत राहिला.

पाणघोड्याचा हा मजेशीर व्हिडीओ @pulseindia.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. यात पाणघोड्याने दिलेली रिअॅक्शन पाहून नेटकरीही पुरेपूर आनंद घेत आहेत. एका युझरने लिहिले, “हिप्पो, भावा, तू हे मनावर घेतलंस; आता तू फक्त बदलाच घेणार!” दुसऱ्याने गमतीने म्हटले, “बिचाऱ्याचा राग योग्य आहे, त्याने चांगला नाश्ता केला असता.” आणखी एका युझरने कमेंट केली, “काय अप्रतिम लूक आहे भावा.”