Bull Attacks Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहून एकतर तुम्ही पोट धरुन हसता किंवा अचंबित होता. पण काहीवेळा असे काही व्हिडीओ असतात जे पाहिल्यानंतर थरकाप उडतो. सध्या असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात एक चवताळलेला बैल काय करु शकतो हे दिसतेय, यातून बैल किती ताकदवान प्राणी आहे याचाही अंदाज येईल. अनेकांनी या ताकदवान बैलाला देसी हल्क असे म्हटलेय.

व्हिडिओमध्ये एक महाकाय बैल ‘यमराजा’ प्रमाणे रस्त्याच्या मधोमध उभा असल्याचे दिसतेय.यावेळी एक ट्रॅक्टर पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण ते पाहून बैल चवताळतो आणि त्यानंतर जे घडते ते पाहून नेटकरी भयभीत झाले आहेत. चालक काही हालचाल करण्यापूर्वीच बैल आपली शिंगे ट्रॅक्टरच्या पुढच्या भागावर घुसवतो. यावेळी बैलाचा हल्ला इतका शक्तिशाली होता की, त्याने आपल्या शिंगांच्या एकाच फटक्यात त्या जड ट्रॅक्टरला खेळण्यासारखे हवेत उडवले.

व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, बैलाच्या शक्तिशाली हल्ल्यामुळे ट्रॅक्टरच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. बैल हल्ला करताच ट्रॅक्टर चालक आपला जीव वाचवण्यासाठी तात्काळ ट्रॅक्टर सोडून पळ काढतो. तर दुसरीकडे बैल ट्रॅक्टरवर आपला राग काढतच राहतो. बैलाने ट्रॅक्टरवर एकमागोमाग एक असे चार वेळा हल्ला केला. याच ट्रॅक्टरची बाजू पूर्णपणे डॅमेज झाली.यावरुन बैल आपल्या ताकदीने काय करु शकतो याचा अंदाज येईल.

बैलाचा हा व्हिडीओ aura.decoded नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला तर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या. एका युजरने आश्चर्याने लिहिले की, “हा खऱ्या आयुष्यातील बाहुबलीमधला बैल आहे.” दुसऱ्याने म्हटले, “बैल नाही, त्याला खरा मृत्यू म्हणा, भावा.” आणखी एका युझरने कमेंट केली की “ड्रायव्हरने वेळीच उडी मारल्यामुळे तो नशीबाने वाचला, नाहीतर तो चिरडला गेला असता.”