Leopard Attack Crocodile Viral Video : बिबट्या हा अत्यंत हुशार आणि चपळ शिकारी प्राणी आहे. तो योग्य संधीची वाट पाहून नंतर अचूकतेने शिकारीवर हल्ला करतो. तर मगरीही तितकीच धोकादायक शिकारी आहे, जिच्या हल्ल्यातून भल्याभल्या प्राण्यांची सुटका होणं कठीण असते. त्यामुळे मगर काय किंवा बिबट्या अशा क्रूर शिकारी प्राण्यांपासून प्राणी जरा अंतर ठेवूनच राहतात. सध्या मगर आणि बिबट्याचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात बिबट्या क्षणात मगरीला भक्षक बनवताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडिओमध्ये पाहू शकता की, मगरीने एका प्राण्याची शिकार केलीय आणि ती शिकार मगर नदीकाठी थांबून खाण्याचा प्रयत्न करतेय. यावेळी दबक्या पावलांनी अचानक एक बिबट्या आला आणि त्याने एका झटक्यात मगरीला आपले शिकार बनवले. त्याने मगरीला पळून जाण्याची संधीच दिली नाही. शिकार खाणाऱ्या मगरीवर त्याने वेगाने झडप घातली आणि तिची मान जबड्यात पकडून जंगलात ओढत नेले.या दृश्यातून जंगलात एखादा प्राणी कितीही मोठा शिकारी असो त्यालाही कधीतरी शिकार बनले जाते हे दिसते.
बिबट्याचा मगरीवर जीवघेण्या हल्ल्याचा हा व्हिडीओ @TheeDarkCircle या एक्स अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “एक क्षण तुम्ही खाताय आणि दुसऱ्या क्षणी तुम्ही एखाद्याचं खाणं बनता. अनेकांनी या भयानक व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.
व्हिडिओ पाहून एकाने कमेंट केली की, “छोटी मगर त्याचे अन्न खाताना खूप आवाज करत होती, नाहीतर बिबट्याला कदाचित ती मासे खात असल्याचे लक्षात आले नसते.” दुसऱ्याने लिहिले की, “हीच अन्नसाखळी आहे.” अनेकांनी बिबट्याच्या ताकदीचे आणि रणनीतीचे कौतुकही केले.
