Viral video : सोशल मीडियावरचे व्हायरल व्हिडीओ खूप काही शिकवतात. काही प्राण्यांचे व्हिडीओ इतके व्हायरल झाले आहेत की, लोकांनी ते पुन्हा पुन्हा पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच पद्धतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक गोष्ट पाहायला मिळत आहे की, प्रत्येकाने बिकट परिस्थितीसमोर गुडघे टेकण्यापेक्षा सामना करायला हवा. अशाच एका हरीण आणि मगरीचा व्हिडीओ समोर आला आहे.

दरम्यान, एका हरणानं मगरीला चांगलंच अस्मान दाखवलंय. हरीण मगरीच्या तावडीतून अतिशय हुशारीनं सुटलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हरणाची हुशारी पाहून तुम्हीही नक्कीच अवाक् व्हाल.

सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ एक मिनिटाचा आहे. नदी पार करीत असलेल्या हरणाच्या पाठीमागे मगर लागल्याचं दिसत आहे. हरीण कितीही चपळ असलं तरी पाण्यात मात्र त्याला तितक्या चपळतेनं पळता येत नाहीये. त्यामुळे मगर कधीही त्याच्यावर हल्ला करील आणि हरणाची शिकार होईल, असं सुरुवातीला वाटतं. मात्र, ज्यावेळी मगर मागच्या बाजूने हरणावरती हल्ला करते, त्यावेळी हरीण मोठी उडी मारते आणि मगरीच्या तावडीतून थोडक्यात सुटते. व्हिडीओ पाहत असताना एक वेळ असं वाटतं आहे की, मगर हरणाची शिकार करील. परंतु, हरणाच्या चलाखपणापुढे मगरीनंही हार मानली आहे. मगरीला पाहून अनेकांना घाम फुटतो; मात्र मगरीच्या हल्ल्यानंतर हरणानं जोरात उड्या मारत प्रवास केला आणि किनाऱ्यावर हरीण पोहोचल्यानंतर त्यानं क्षणात धूम ठोकली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! हरीण तावडीतून असं सुटलं की थेट सिंहच तोंडावर आपटला; पाहा VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर __priti__1122 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करताना ‘त्यामुळे खचून जाऊ नका..’ असं कॅप्शन त्याला दिलं आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाइक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत.

लोकांना कायमच वन्य जीवनाविषयी कुतूहल असतं. प्राण्यांना पाहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेक जण तयार असतात. वन्य जीवनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बरेच जण जंगल सफारीसाठीही जातात. प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते.