आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या प्रचंड ज्ञान आणि नितीशस्त्राच्या बळावर चंद्रगुप्त मौर्य यांना राजा बनवले होते. चाणक्य यांनी आपल्या नितीशास्त्रामध्ये अनेक अशा अमूल्य गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अत्यंत समर्पक ठरतात.
चाणक्य नितीच्या अशाच एका महत्त्वाच्या श्लोकात त्यांनी गुरू, पत्नी, नातेवाईक आणि धर्म यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
श्लोक
त्यजेद्धर्म दयाहीनं विद्याहीनं गुरुं त्यजेत्।
त्यजेत्क्रोधमुखी भार्या निःस्नेहान्बान्धवांस्यजेत्।।
असा धर्म त्यागून द्यावा (Abandoning a religion devoid of compassion)
आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या धर्मामध्ये दया किंवा करुणेला स्थान नाही, असा धर्म लगेच सोडून दिला पाहिजे. जो धर्म माणसाला दया शिकवत नाही, तो धर्म निरर्थक आहे. ज्या धर्मात दया आणि सहानुभूतीची भावना असते, तोच खरा आणि श्रेष्ठ धर्म मानला जातो.
अशा गुरूंकडून घेऊ नये शिक्षण (Abandoning an unlearned or incompetent guru)
चाणक्य यांच्या मते, ज्या गुरूंकडे योग्य ज्ञान नाही, अशा गुरूंचा त्याग केला पाहिजे. केवळ गोड बोलून प्रभावित करणारे परंतु वास्तविक ज्ञान देऊ शकणारे गुरू विद्यार्थ्याचे भविष्य अंधारात ढकलू शकतात. त्यामुळे ज्ञानाशिवाय असलेल्या गुरूपासून कायम लांब राहावे.
अशा पत्नीचा त्याग करावा (Abandoning a short-tempered and angry wife)
जर पत्नी सतत रागाव स्वभाव असणारी किंवा अतिशय क्रोध करणारी (क्रोधमुखी) असेल, तर आचार्य चाणक्य अशा पत्नीचा त्याग करण्याचा सल्ला देतात. नेहमी रागवणारी स्त्री कुटुंबाला कधीही एकत्र किंवा व्यवस्थित ठेवू शकत नाही. अशा स्वभावामुळे घरात कायम कलह आणि अशांतता टिकून राहते.
अशा भाऊ-बहिणींपासून दूर राहावे (Cutting ties with unloving or indifferent siblings)
चाणक्य स्पष्ट करतात की, ज्या भाऊ-बहिणींच्या किंवा नातेवाईकांच्या मनात आपल्याबद्दल प्रेम किंवा आपुलकीची कोणतीही भावना नाही, त्यांच्यापासून तातडीने दूर झाले पाहिजे. ज्या नात्यात स्नेहाचा अभाव असतो, त्या नात्याला माणसाच्या आयुष्यात काहीही स्थान असत नाही.
थोडक्यात सांगायचे तर…
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टी आजही तितक्याच अचूक आणि मार्गदर्शक ठरतात, जितक्या त्या त्या काळात महत्त्वाच्या होत्या. आजच्या युगातही ज्ञानाचा अभाव असणारे ढोंगी गुरू, पती-पत्नीच्या नात्यात दुरावा आणणारा अतिरिक्त राग, नात्यांमधील ओलावा संपणे आणि धर्माच्या नावाखाली चालणारे देखावे या समस्या समाजात आजही कायम आहेत. चाणक्यांच्या या विचारांचे महत्त्व आजच्या काळातही तितकेच ताजे आणि महत्त्वाचे वाटते.
