सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर येतात, जे एकतर आपल्याला धडा देतात किंवा जगासमोर मानवतेचे उदाहरण देतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो माणुसकी, कर्तव्य आणि धैर्याची उदाहरणे देत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यातील आहे. अनाइवरी धबधब्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने परिस्थिती इतकी बिकट झाली की एक महिला तिच्या लहान मुलासह धबधब्यात अडकली. मात्र, त्याला वाचवण्यासाठी काही लोकांनी आपल्या जीवाचीही पर्वा न करता या धोकादायक परिस्थितीत दोघांनाही वाचवले. आता या बचावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वजण बचावकर्त्यांच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार, कालवरायण टेकड्यांजवळ मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनैवारी धबधब्याच्या पाण्याची पातळी अचानक झपाट्याने वाढू लागली. हा सर्व प्रकार इतक्या वेगाने घडला की तेथे उपस्थित पर्यटकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. अनाइवरी धबधबा हे सेलम जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. जिथे बरेच लोक भेटायला जातात. शेवटच्या वीकेंडलाही येथे मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी आले होते. सर्व काही ठीक होते, पण अचानक पाण्याची पातळी वाढू लागली आणि संपूर्ण वातावरण धोकादायक बनले.

( हे ही वाचा: त्या लाइव्ह शोमधून शोएब अख्तर अचानक बाहेर का पडला?; Video Viral झाल्यानंतर म्हणाला, “तो प्रकार…” )

( हे ही वाचा: Video: एकाच बुक्क्यात गप गार… वृद्ध ग्राहकाला धक्का दिल्याने रेस्टराँमध्ये राडा )

कसं वाचवलं?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका बाजूला पाण्याचा प्रवाह तर दुसरीकडे निसरडे खडक दिसत आहेत. या ठिकाणी एक महिला आपल्या लहान मुलासह अडकलेली दिसत आहे. पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान दिसतो की, बचावकार्यही कठीण होऊन बसते.पण, तिथे काही वन अधिकारी जीवाची पर्वा न करता धाडस दाखवून आई आणि मुलाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतात. निसरड्या खडकांवर ते दोघांना कसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि शेवटी ते दोघेही सुखरूप बाहेर पडतात हे तुम्ही पाहू शकता.

( हे ही वाचा: मटका मॅन : लंडनवरुन भारतात आला अन् गरिबांसाठी ‘जीवन’दाता झाला; आनंद महिंद्राही झाले इम्प्रेस, म्हणाले…)

हा व्हिडीओ आयएएस अवनीश शरणने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – सुपरहीरो, ह्यूज रिस्पेक्ट. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी काही काळ धबधब्याला भेट देणे बंद केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With child the mother was caught in a rushing waterfall man saving lives captured in thrilling video camera ttg
First published on: 27-10-2021 at 13:45 IST