Gathering of 2500 people Without Clothes: जर एखाद्या गोष्टीला आपला विरोध असेल तर सामुहिक त्याला विरोध करण्याची एक पद्धत म्हणजे निषेध व्यक्त करणे. निषेधाचे प्रत्येक देशात वेगवेगळे प्रकार असतात. एखाद्या मागणीबद्दल निषेध करण्याच्या बातम्या आपण अनेकवेळा पाहतच असतो. हल्लीच अमेरिकेतील काही आंदोलकांनी विमानाच्या धावपट्टीवर बसून आपला विरोध दर्शवला. सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात एक वेगळ्याच पद्धतीचा विरोध समोर आला आहे. यात हजारो लोकांनी चक्क कपडे न घालता एका जनजागृती कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. या निषेध कार्यक्रमाचा व्हिडिओचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहेत. जाणून घेऊया या नेमक्या प्रकरणाबद्दल…

सिडनी शहरातील या आंदोलनाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. सिडनी शहरातील बोंडी बीचवर ही घटना घडली आहे. या बीचवर तब्बल २५०० लोक एकत्र जमले होते. त्वचेच्या कर्करोगासंदर्भात जनजागृत करण्यासाठी हे सर्व लोक एकत्र जमले होते

Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
BJP Vijay Wadettiwar criticizes Ajit Pawar and Shinde group gadchiroli
अजित पवार व शिंदे गटाची अवस्था रस्त्यावरच्या भिकाऱ्यापेक्षाही वाईट; वडेट्टीवार म्हणाले, ‘भाजपचे गुलाम…’
Kandalvan Ulwe node
उलवे नोडमध्येही कांदळवनावर भराव, सिडको आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

नग्न होत तब्बल २५०० लोक एकत्र जमले

मिळालेल्या माहितीनुसार सिडनीतील या बोंडी बीचवर जमलेल्या २५०० लोकांनी प्रशासनाकडून आधीच परवानगी देखील घेतील होती. या कार्यक्रमात सहभागी झालेली लोकं बहुतांश लोक कर्करोगाशी संबंधित आहेत. त्यातील काहीजणांना कर्करोग झाला आहे किंवा ते कर्करोग असणाऱ्यांना मदत करत आहेत. यातील काहीजण कर्करोगावर मात करत बरे देखील झाले आहेत.

( हे ही वाचा: Video: डोक्यावर पदर, लेहेंगा आणि ते…; ‘या’ दोन महिलांच्या तुफान बुलेटस्वारीवर नेटकरीही फिदा)

सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ झाले व्हायरल

( हे ही वाचा: Video: माउंटेन सिंहाने ‘भुताचा’ आवाज काढताच पोलीसाला फुटला घाम; थेट पळत सुटला अन..)

सिडनीतील बीचवर झालेल्या हा कार्यक्रम हा स्पेन्सर ट्युनिक या अमेरिकन फोटोग्राफरचा असल्याची माहिती समोर येते आहे. ऑस्ट्रेलियन लोकांनी आपल्या त्वचेची वरचेवर तपासणी करावी यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाने सर्व जगाचेच लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर तर या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.