…तर ट्विटरच्या सर्व व्हेरिफाइड अकाउंट्सच्या ब्लू टीक जाणार! एलॉन मस्क यांचा इशारा

Twitter: १ एप्रिलपासून ट्विटरकडून हे नवीन नियम लागू करण्यात येतील. भारतात ट्विटरच्या ब्लू टिकसाठी ९०० रुपये प्रति महिना शुल्क आहे. 

twitter blue tick
एलॉन मस्क यांचा इशारा (photo- indian express)

एलॉन मस्क ट्विटरवर मालकी मिळवल्यानंतर ते लागोपाठ चर्चेत येत आहेत. ट्विटरमधील मोठ्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणाऱ्या एलन मस्क यांनी मोठ मोठ्या निर्णयाचा धडाका लावला आहे. ट्विटरचे ब्लूटिक व्हेरिफिकेशनसाठी पैसे मोजावे लागत असल्याने सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे.यापूर्वी काही ठरावीक लोकांनाच ब्लू टीक दिली जायची मात्र आता पैसे देऊन कोणालाही ब्लू टीकसाठी सबस्क्रिप्शन मिळू शकतं.  १ एप्रिलपासून ट्विटरकडून हे नवीन नियम लागू करण्यात येतील. भारतात ट्विटरच्या ब्लू टिकसाठी ९०० रुपये प्रति महिना शुल्क आहे. 

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

पेड सबस्क्रिप्शन नसणाऱ्यांचं ब्लू टिक हटवणार –

ट्विटरचे मालक एलॉन मस्क नेहमीच ट्विटरवर वेगवेगळे नियम घेऊन येतात. हल्लीच त्यांनी ट्विटर व्हेरिफिकेशन बंद करुन ट्विटर सबस्क्रिप्शन सेवा नव्या अटींसह सुरु केली आहे. या नियानुसार तुम्ही ब्लू टिक सबस्क्रिप्शन घेतलं नसेल आणि पूर्वीच तुमच्या अकाउंटला ब्लू टीक आहे अशा युजर्सनी प्रोफाईल नाव किंवा फोटो बदलल्यास त्यांचं ब्लू टीक जाऊ शकते. ट्विटरवर ज्यांच्या अकाउंटला पूर्वीच ब्लू टीक आहे, आणि त्यांनी ट्विटरवर ब्लू टीकसाठी सबस्क्रिप्शन घेतलं नाहीये, अशा ट्विटर वापरकर्त्यांनी व्हेरिफाइड अकाउंटसवर पैसे न भरल्यास त्यांना ब्लू टीक गमवावी लागणार असल्याचा इशारा एलॉन मस्क यांनी दिला आहे. यामध्ये पत्रकार, सेलिब्रिटी, राजकारणी, ज्यांनी ब्लू टिकसाठी पैसे दिले नाहीत अशा सगळ्यांच्या अकाउंट्सची ब्लू टीक जाऊ शकते.

हेही वाचा – भारतीय रेल्वेला मालामाल करणारी ‘ती’ ठरली पहिली महिला, तिकीट निरीक्षकाचा विक्रम पाहून बसेल धक्का!

सबस्क्रिप्शननंतर मिळणार या सुविधा –

तुम्ही तुमच्या ट्विटर अकाउंटचे ब्लू टिक सबस्क्रिप्शन घ्याल तेव्हा, ट्विट एडिट करणे, जास्त मिनिटांचे व्हिडीओ अपलोड करता येणार आहेत. रिडर मोड आणि ब्लू टीक या सेवा तुम्हाला मिळणा असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ब्लू टीक सबस्क्रिप्शनसाठी तुमचे अकाउंट हे ९० दिवस जुने असणे आणि व्हेरिफाईड फोन नंबर असणे आवश्यक आहे. तसेच ब्लू टीक सबस्क्रिप्शन असलेल्या अकाउंटवरील जाहरातींची संख्याही कमी असेल असे मस्क यांनी स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 11:40 IST
Next Story
भारतीय रेल्वेला मालामाल करणारी ‘ती’ ठरली पहिली महिला, तिकीट निरीक्षकाचा विक्रम पाहून बसेल धक्का!
Exit mobile version