scorecardresearch

नवरा असेल तर बायकोला होतात हे फायदे! तुम्ही कधी विचार देखील केला नसेल, पाहा VIRAL VIDEO

लग्नानंतर मुलींना नवरा म्हणजे डोक्याची कटकट वाटू लागते. नवऱ्याची कटकट कधी एकदाची संपते असं अनेक मुलींना वाटत असतं. पण नवऱ्याची कटकट वाटत असली तरी लग्न केल्यानंतर नवऱ्याचे अनेक फायदे हे मुलींना होतात. पाहा हा व्हायरल व्हिडीओ…

Husband-Wife-Viral-Video
(Photo: Instagram/ zo_wed)

पती-पत्नीचे नाते म्हटले की प्रेम आणि त्यासोबत रूसवे फुगवे आलेच. लग्नानंतर मुलींना नवरा म्हणजे डोक्याची कटकट वाटू लागते. नवऱ्याची कटकट कधी एकदाची संपते असं अनेक मुलींना वाटत असतं. पण नवऱ्याची कटकट वाटत असली तरी लग्न केल्यानंतर नवऱ्याचे अनेक फायदे हे मुलींना होतात. डोकेदुखी वाटणारा नवरा मुलींना बऱ्याच गोष्टींसाठी कामी पडत असतो. याचा एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहणं फारच मनोरंजक आहे. डोकेदुखी वाटणाऱ्या नवऱ्याची असेही काही रूप पाहून अनेक मुली-बायका या व्हिडीओलाचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका नवरा बायकोचा आहे. या व्हायरल व्हिडीओमधल्या नवरा-बायकोचं नाव फजल सरवार आणि अरीशा खान असं आहे. हे दोघेही एकमेकांसोबतचे अनेक व्हिडीओ आणि फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. अनेकदा लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांचे उणे-दुणे काढत तक्रार करताना दिसून येतात. पण लग्नानंतर पती असण्याचे फायदे देखील असतात, हे सांगण्यासाठी अरीशा खान हीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोघे नवरा बायको सुरूवातीला दिसतात, त्यानंतर बायकोला किचनमध्ये उंचावर ठेवलेली एक वस्तू घ्यायची असते. पण तिची उंची कमी पडत असल्यामुळे तिला ते जमत नाही. मग तिचा नवरा किचनमध्ये येतो आणि मग ती नवऱ्याला उंचावर ठेवलेली वस्तू द्यायला सांगते. नवरा अगदी सहज हाताने ती उंचावर ठेवलेली वस्तू घेतो आणि तिला देतो. नवरा एक शिडी म्हणून उपयोगाचा ठरतो. लॅपटॉपवर काम करता करता काही अडचणी आल्या की ती नवऱ्याकडे जाऊन अडचणी दूर करते. म्हणजे तो एक फ्री टेक्नीशिअन म्हणून कामी येतो.

आणखी वाचा : मालकीणीला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणून मांजरीने काय शक्कल लढवली, पाहा VIRAL VIDEO

कुठेही बाहेर फिरायला गेलं की तिथे फोटो काढून देण्यासाठी एक फ्री फोटोग्राफर म्हणून देखील उपयोगाचा ठरतो. कुठेही बाहेर जाताना नवराच गाडी चालवतो आणि म्हणून तो एक फ्री ड्रायव्हर म्हणून देखील कामी येतो. तुमची सर्व बिल भरण्यासाठी देखील नवरा तुमच्या कामी येतो. मॉलमध्ये कुठे शॉपिंगला गेलात की तिथे अवजड सामान उचलण्यासाठी देखील नवराच कामी येतो. घरातला कचरा बाहेर फेकण्यासाठी नवराच उपयोगी येतो. पाठीमागून काही पिन, बटण लावायचं असल्यास हे काम सुद्धा नवरा करत असतो. घरात एखादी वस्तू बिघडली की दुरूस्त करण्यासाठी सुद्धा नवराच कामी येतो. अशा अनेक कामासाठी नवऱ्याचा कसा उपयोग होतो हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलंय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : महिलेला वाटलं किचनमध्ये चोर घुसला, पण प्रत्यक्षात जे दिसलं ते पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : OMG! मगरीने चक्क व्यक्तीच्या अंगावरच उडी घेतली, अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ पाहताना सुरूवातीला नवऱ्याची अवस्था पाहून हसू आवरत नाही. पण हा व्हिडीओ सगळ्याच मुलींच्या दैनंदिन कामकाजामधील गोष्टी दाखवणारा असल्यामुळे या व्हिडीओला मुलींची मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय. हा व्हिडीओ zo_wed नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. व्हिडीओमधील पती-पत्नी फजल आणि अरीशा यांनी नवरा-बायकोचं नाचं अगदी परफेक्ट पद्धतीने सादर केलं आहे.
हा व्हिडीओ लोकांना फारच आवडत असून हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यावाचून राहत नाहीत. बघता बघता या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईक सुद्धा केलं आहे. या मजेदार व्हिडीओवर लोकांच्या कमेंट्स देखील वाचण्यासारख्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wives get many benefits from husband watch viral video funny video prp

ताज्या बातम्या