Premium

बसमध्ये तरुणाचं कृत्य पाहून महिला लागली भूंकायला; VIDEO पाहून कळेल नेमकं झालं तरी काय

Viral video: बसमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली म्हणून महिला व्यक्तीवर भुंकली, Video पाहून चक्रावून जाल

Woman barks at a man for playing music without headphones on the bus video goes viral
महिला व्यक्तीवर भुंकली

अनेकांना बसचा प्रवास हा कमी खर्चीक आणि आरामदायक वाटतो. त्यामुळे बरेच जण बसने प्रवास करण्याचा आनंद घेतात. परंतु, अनेकदा बसमध्ये सीट किंवा तिकिटावरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये जोरदार भांडण होतं. बसमध्ये अनेक प्रवासी दररोज प्रवास करतात. सहसा बसमध्ये प्रवासादरम्यान गर्दी असते त्यामुळे लोकांमध्ये जागेवरुन किंवा इतर कारणांवरुन भांडण होतं. अशा अनेक घटना समोर येत असतात. दरम्यान अशाच एका तरुण आणि तरुणीच्या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही खरंच डोक्याला हात लावाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक वाहनांमध्ये काही नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. मात्र काही लोकांना सार्वजनिक ठिकाणी कसं राहायचं याचं अजिबात ज्ञान नसतं. कधी कधी काहींना सांगूनही ते एकत नाहीत. असाच एक तरुण सार्वजनिक बसमध्ये मोठ मोठ्यानं गाणी एकत होता. यावेळी इतर प्रवाशांना याचा त्रास होतोय याकडे त्याचं लक्षच नसतं. दरम्यान एक तरुणी याबद्दल तरुणाला सांगते. मात्र तो तिलाच उलटं बोलतो. मग मात्र तरुणीला राग येतो.

मग तरुणी त्याला चांगलाच इंगा दाखवते. तरुणी मोठ मोठ्यानं कुत्र्यासारखं त्याच्या समोर जाऊन भूंकू लागते. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओला आतापर्यंत ६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: एकावं ते नवलंच! गुटखा खाणाऱ्यांसाठी भव्य स्पर्धा; बक्षिस पाहून चक्रावून जाल

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण चर्चा करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @PicturesFoIder नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत ३० हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालं नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman barks at a man for playing music without headphones on the bus video goes viral srk

First published on: 30-11-2023 at 16:41 IST
Next Story
तुम्ही कधी असा विचित्र आवाज ऐकलाय का? ‘या’ पक्ष्याचे ‘असूरी हास्य’ ऐकून बसेल धक्का! पाहा Viral Video