Woman Commando पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले आहेत. ४ जून २०२४ या दिवशी लागलेल्या निकालानंतर १० जून २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडला. दरम्यान सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेत आले आहेत कारण त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत त्यांच्यासह एक महिला SPG कमांडो ( Woman Commando ) असावी अशी शक्यता वर्तवली जाते आहे आहे. महिला कमांडो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात पहिल्यांदाच दिसली आहे. त्यामुळे या फोटोची चर्चा रंगली आहे.

कंगना रणौत यांनी स्टेटसला ठेवलेला फोटो व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यातील महिला कमांडोचा ( Woman Commando ) हा फोटो अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी स्टेटसला ठेवला. ज्यानंतर या महिला कमांडोचा फोटो व्हायरल झाला आहे. अनेक भाजपा नेत्यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर हा फोटो पोस्ट केला आणि महिला शक्तीचं उत्तम उदाहरण हे मोदींनी दाखवून दिल्याचा उल्लेख केला आहे. तसंच अनेकांनी महिला कमांडो पहिल्यांदाच मोदी यांच्या ताफ्यात दिसली आहे हे चित्र सकारात्मक आहे अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही महिला कमांडो ( Woman Commando ) एसपीजी (Special Protection Group) कमांडो असावी अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. दरम्यान या महिला कमांडोचं ( Woman Commando ) नाव काय? आणि ती कुठल्या शाखेत काम करते हे समजू शकलेलं नाही. मात्र महिला कमांडो काही वर्षांपासून एसपीजीचा भाग आहेत त्यामुळे ही महिला कमांडो एसपीजीची असावी ही शक्यता आहे.

Bride push down the groom on stage over bride dont want to marry him video goes viral on social media
VIDEO: “अरेंज मॅरेज किती भीतीदायक आहे” भर लग्नात स्टेजवरच नवरदेवासोबत नवरीनं काय केलं पाहा
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Prayagraj Maha kumbh Mela 2025 Date Time Schedule in Marathi
Maha Kumbh Mela 2025 Date: कधी होणार महा कुंभ मेळा; कुठे होईल आयोजन? काय आहेत शाही स्नानाच्या तारखा? वाचा सविस्तर!
IPS Harsh Bardhan
IPS Harsh Bardhan : कर्नाटकमध्ये भीषण अपघातात आयपीएस अधिकाऱ्याचा मृत्यू; पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना घडली दुर्दैवी घटना
the Indian soldier returned home safely After serving the country for 21 years
२१ वर्ष देशसेवा करून सुखरूप घरी परतला भारतीय जवान, पत्नीचे अश्रु थांबत नव्हते; VIDEO पाहून व्हाल भावुक
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?

महिला एसपीजी कमांडो संसदेत तैनात

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो संसदेच्या परिसरातला आहे. संसदेच्या परिसरात महिला एसपीजी कमांडो ( Woman Commando ) तैनात असतात. २०१५ पासून CPT अर्थात Close Protection Team तयार करण्यात आली आहे. हे पथक एसपीजीचाच भाग आहे. त्यामुळे ही व्हायरल फोटोतली ही महिला एसपीजी कमांडो असावी असा अंदाज वर्तवला जातो आहे. सध्याच्या घडीला एसपीजी मध्ये १०० महिला कमांडो आहेत. CPT आणि SPG अशा दोन्ही ठिकाणी या महिला कार्यरत असतात.

SPG कमांडो यांची भूमिका काय असते?

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ची स्थापना १९८५ मध्ये झाली. देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे सख्खे नातेवाईक यांना ही सुरक्षा पुरवली जाते. तसंच माजी पंतप्रधानांनाही ही सुरक्षा दिली जाते. एसपीजीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशिष्ट प्रशिक्षण देऊन तयार केलं जातं. तसंच काहीही झालं तरीही पंतप्रधानांची सुरक्षा करणं ही त्यांच्यावरची जबाबदारी असते.