प्रेमासाठी तुम्ही किती दूर जाऊ शकता? या वाक्याला नवसंजीवनी आणि ट्विस्ट देत बांगलादेशातील एका मुलीने एक धक्कादायक पराक्रम केला आहे. ती आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी बांगलादेशातून सीमा ओलांडत भारतात आली, तेही पोहून. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २२ वर्षीय तरुणीने तिच्या ‘बॉयफ्रेंड’साठी इतके अंतर पोहत पार केले आहे. आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी या तरुणीने भारताची सीमा पोहत ओलांडली आहे.

मुलीने सुंदरबनचे भयानक जंगलही पार केले. शिवाय जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून कायदेही मोडले. कृष्णा मंडल असे या महिलेचे नाव आहे. कृष्णाची फेसबुकवर अभिक मंडलसोबत भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अभिकला भेटण्यासाठी उत्सुक असलेल्या कृष्णाजवळ वैध पासपोर्ट नसल्याने तिने जलमार्ग त्याच्याजवळ पोहचण्याचा निश्चय केला. पोलीस सूत्रांनुसार, तिने आधी रॉयल बंगाल टायगर्ससाठी लोकप्रिय असलेल्या सुंदरबनमध्ये प्रवेश केला.

Viral Video : रिपोर्टरने विद्यार्थ्याला विचारला टॉयलेटचा अर्थ; मुलाचे उत्तर ऐकून तुम्हालाही आवरणार नाही हसू

सुंदरबनमध्ये पोहोचल्यानंतर ती आणखी तासभर पोहत तिच्या गंतव्यस्थानी पोहोचली. तिथे तिला तिचा प्रियकर अभिक भेटला आणि नंतर कोलकाता येथील कालीघाट मंदिरात या दोघांनी लग्नगाठ बांधली. बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी कृष्णाला सोमवारी अटक करण्यात आली. कृष्णाला आता बांगलादेश उच्चायुक्तांकडे सोपवण्यात येणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी एक बांगलादेशी तरुण त्याच्या आवडत्या चॉकलेटची खरेदी करण्यासाठी सीमा ओलांडून गेला होता. रिपोर्ट्सनुसार, इमान हुसैनने आपले आवडते चॉकलेट खरेदी करण्यासाठी भारताची सीमा ओलांडली होती. या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली असून त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.