''पागल ये जवानी है, मेरा हुस्न पाणी है' गाण्यावर तरुणीचा चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर भन्नाट डान्स, नजरा खिळवणारा Viral Video पाहतच राहाल | Loksatta

‘पागल ये जवानी है, मेरा हुस्न पाणी है’ गाण्यावर तरुणीचा चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर भन्नाट डान्स, नजरा खिळवणारा Viral Video पाहतच राहाल

तरुणीचा चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर भन्नाट डान्स, व्हायरल व्हिडीओ पाहतंच राहाल

girl dance viral video
रेल्वे स्थानकात तरुणीने भन्नाट डान्स केला. (image-social media)

सोशल मीडियावर लोकांची वाहवा मिळवण्यासाठी आताच्या जमान्यात कोण काय शक्कल लढवेल याचा नेमंच राहिला नाही. भर रस्त्यात दुचाकीवर स्टंटबाजी करणे, भन्नाट डान्स करणे, प्राण्यांसोबत मस्ती करणे, सापांसोबत खेळ करणे, अशाप्रकारचे अनेक कारनामे करताना लोक व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहेत. अशाच एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. एका तरुणी गायिका अल्का यागनिक यांच्या ‘पागल ये जवानी है मेरा हुस्न पाणी है’ गाण्यावर चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवरंच थिरकली. तिचा भन्नाट डान्स पाहून शेजारी उभ्या असलेल्या प्रवाशांच्याही नजरा खिळल्या.

रेल्वे स्थानकात ट्रेनला यायला उशीर झाल्यास काही ना काही करमणूक म्हणून अनेक प्रवासी वृत्तपत्र वाचण्यात, मोबाईल मध्ये किंवा गप्पा मारण्यात वेळ घातवतात. काही जण फावल्या वेळात ज्यूस, स्नॅक्स खाण्याचा आस्वाद घेतात. पण ट्रेनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एका तरुणीनं नादच केला. ‘पागल ये जवानी है मेरा हुस्न पाणी है’ या गाण्यावर रेल्वे प्लॅटफॉर्मवरच भन्नाट डान्स केला.

नक्की वाचा – रशियातही ‘पुष्पा’ फिव्हर, ‘सामी सामी’ गाण्यावर रशियन महिला थिरकल्या, चिमुकल्यांचाही भन्नाट डान्स, Video होतोय तुफान Viral

इथे पाहा व्हिडीओ

ट्रेनची वाट पाहणाऱ्या या तरुणीनं लोकांचं मनोरंजन करण्यासाठी ज्याप्रकारे डान्स केला ते पाहून सर्वांना धक्काच बसला आहे. कारण या गाण्यावर ती तरुणी संपूर्ण उत्साहात नाचताना या व्हिडीओत दिसत आहे. ती इतक्या जबरदस्त शैलीत नाचत आहे की, तिला रेल्वे स्थानकात नाचत असल्याचा भानंच राहिला नाही. तिचा डान्स पाहण्यासाठी रेल्वे स्थानकात असणाऱ्या प्रवाशांनी गर्दी केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला अंश सिंग नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केलं आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं, आता समजलं, हे रेल्वेवाले प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर का वाढवतात..

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 12:59 IST
Next Story
प्लास्टिकचा कचरा द्या आणि मोफत चहा प्या! उदयपूरच्या युवकाचा स्वच्छतेसाठी भन्नाट उपक्रम; पाहा Video