दिल्लीमधील एका नामांकित रेस्तराँमध्ये एका महिलेला केवळ तिने भारतीय पेहराव केल्याने प्रवेश नाकारण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. हा सर्व प्रकार अ‍ॅक्वीला या रेस्तराँमध्ये घडल्याचं सांगण्यात येत आहे. दिल्लीमधील ऑगस्ट क्रांती मार्ग येथे हे रेस्तराँ आहे. साडी नेसलेली एक महिला रेस्तराँमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात असतानाच तिला कर्मचाऱ्यांनी अडवलं. हा व्हिडीओ आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय.

सोशल नेटवर्किंगवर १६ सेकंदांची एक क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये प्रवेश नाकारण्यात आलेली महिला रेस्तराँच्या ड्रेसकोडसंदर्भातील नियमांबद्दल विचारणा करताना दिसत आहे. “साडी नेसलेल्यांना प्रवेश नाही असं कुठे नमूद करण्यात आलंय दाखवा,” असं ही महिला विचारते. यावर रेस्तराँची कर्मचारी, “मॅडम, आम्ही फक्त स्मार्ट कॅज्युअल कंपड्यांमध्ये असणाऱ्यांना प्रवेश देतो. साडी हा स्मार्ट कॅज्यूअल (कपड्यांमधील) प्रकार नाही,” असं सांगून निघून जाते.

Rajasthan Loksabha Election 2024 Left candidate BJP takes donations from beef selling company
गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज

अनिता चौधरी यांनी आधी हा व्हिडीओ शेअर केलाय. “अ‍ॅक्वीला रेस्तराँमध्ये साडी नेसलेल्यांना प्रवेश नाही कारण भारतीय साडी ही स्मार्ट कपड्यांमध्ये येत नाही. मात्र स्मार्ट कपडे म्हणजे काय याची काही ठोस व्याख्या असेल तर मला सांगा. मला स्मार्ट कपडे काय असतं ते सांगा म्हणजे मी साडी नेसणं बंद करेन,” अशा कॅप्शनसहीत त्यांनी व्हिडीओ शेअर केलाय.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन या भेदभावावर टीका केली आहे. ड्रेस कोड पॉलिसीसंदर्भातील धोरणांवर टीका करताना हे कसले फालतू नियम आहेत असं अनेकांनी म्हटलं आहे. भाजपा समर्थक शेफाली वैद्य यांनी ट्विटरवरुन या प्रकरणावर भाष्य केलं आहे. “साडी स्मार्ट वेअर आहे की नाही कोण ठरवणार?, मी अमेरिका, युएई आणि युकेमधील अनेक उत्तम रेस्तराँमध्ये साडी नेसून गेलेय. तिथे मला कोणीही आडवलं नाही. आणि इकडे भारतामध्ये अ‍ॅक्वीला नावाचं एक रेस्तराँ भारतामध्ये ड्रेस कोड ठरवताना साडी ही स्मार्ट ड्रेसकोड नसल्याचं म्हणतंय. विचित्र आहे हे सगळं,” अशा कॅप्शनसहीत वैद्य यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

इतरही अनेकांनी या प्रकराबद्दल नाराजी व्यक्त केलीय.
या रेस्तराँवर कारवाई होणार नाही कारण…

हा माझ्या आईचा फोटो आहे आलप्स पर्वतरांगामधील

काय बावळटपणा आहे हा

आपण गुलामगिरीमध्येच

आपल्या संस्कृतीचं तरी भान ठेवा

हे जाणून बुजून केलं जातंय

यापूर्वीही अशाप्रकारे साडी नेसलेल्या महिलांना रेस्तराँमध्ये प्रवेश नाकारण्याचे प्रकार घडले आहेत.