scorecardresearch

Premium

Video : ‘-१६ तापमानात’ भारतीय सैनिकासोबत केले पुशअप चॅलेंज! पाहिला का हा Viral व्हिडीओ?

सोशल मीडियावर एका तरुणीचा एका सैनिकासोबत बर्फामध्ये पुशअप करतानाच व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहा…

woman doing push up challenge in ice with Indian army soldier
महिलेने भारतीय सैनिकसोबत उणे तापमानात पुशअप केल्याचा व्हिडिओ होत आहे व्हायरल. [photo credit – इन्स्टाग्राम]

तापमान शून्याखाली असताना आणि सगळीकडे बर्फ असताना एका महिलेने एका भारतीय जवानासोबत पुशअप चॅलेंज करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये अतिशय हिमतीने आणि जोशात पुशअप करणाऱ्या या महिलेचे नाव नेहा बांगीया [Neha Bangia] असे आहे आणि ती एक फिटनेस प्रशिक्षक आहे, असे तिच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरून समजते. व्हायरल होणारा हा व्हिडीओदेखील तिने आपल्या @thatfitmum या इन्स्टाग्रामच्या हॅण्डलवरून शेअर केला गेला आहे.

“खरे तर मी माझा पुशअप करतानाचा व्हिडीओ बनवत असताना, मागे उभ्या असलेल्या एका जवानाने मला येऊन सांगितले, ‘इथे आम्ही दररोज व्यायाम करतो. कारण- थंडी सहन करण्यासाठी तोच सर्वोत्तम पर्याय आहे. पण आम्ही कधीच या अशा ठिकाणी कोणत्या स्त्रीला पुशअप करताना पहिले नव्हते.’ त्यानंतर दुसरा जवान माझ्यासोबत पुशअप करण्यासाठी पुढे आला. मी जवळपास १५ पुशअप आधीच मारले होते आणि बर्फामुळे हातही थोडे सुन्न पडले होते. पण आपल्या सैनिकांसोबत व्यायाम करण्याच्या संधीला कुणी नाही कसं म्हणू शकेल? त्यामुळे हे मी माझे भाग्य समजते आणि आपल्या जवानांना सलाम करते,” असे काहीसे भावनात्मक तिने तिच्या व्हिडीओखाली लिहिल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

viral video of egg flipping hack
काय! चक्क दोऱ्याने पलटले ऑमलेट!! Viral Video मधील ‘ही’ ट्रिक पाहून कपाळावर माराल हात
women murdered in Kenya
विश्लेषण : केनियात महिलांच्या इतक्या प्रमाणात हत्या का होताहेत? काय आहे ‘डार्क व्हॅलेंटाइन’ चळवळ?
youth stunt running vehicle pimpri
पिंपरीत धावत्या गाडीच्या टपावर बसून तरुणाची स्टंटबाजी; तरुणाचा पोलीस घेत आहेत शोध!
Iran
अमेरिकेचे इराणला जोरदार प्रत्युत्तर, इराक-सीरियाला केले लक्ष्य; हवाई हल्ल्यात १८ दहशतवादी ठार!

हेही वाचा : कासवाने केला १९१ वा वाढदिवस साजरा! गिनीज बुकनेदेखील घेतली दखल; व्हिडीओ पाहा

इतकेच नव्हे, तर तिने कॅप्शनमधून आपल्या भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. अशा खडतर हवामानामध्ये इतके उत्साही राहून, तेथील सर्व परिस्थिती सहन करून कोणत्याही प्रकारची तक्रार न करता, सदैव आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी ते तत्पर असतात. याबद्दल तिने त्यांचे आभारदेखील मानले आहेत.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओला तब्ब्ल ११.१ मिलियन इतके व्ह्युज मिळाले असून, तीन लाख ७९ हजार लाइक्सदेखील मिळाले आहेत. त्यासोबतच यावर नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यातील काही प्रतिक्रिया पाहा-

या व्हिडीओवर एकाने, “आपल्या भारतीय जवानांना सलाम! काय वेग आहे, खूपच मस्त”, अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्याने, “एवढ्या थंडीतही तुम्ही जवानासोबत तेवढ्याच जिद्दीने पुशअप करीत आहेत याबद्दल फारच कौतुक वाटते,” अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्याने “काही जण म्हणत आहेत की, त्या सैनिकाचा वेग फारच जास्त आहे; पण मिलिटरी पुशअप असेच केले जातात,” असे काहींना खडसावलेले आपल्याला पाहायला मिळेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman doing push up challenge in ice with indian army soldier watch this viral video dha

First published on: 03-12-2023 at 16:40 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×