आंटी जी…आंटी जी… गेट अप अँड डान्स हे गाणं तुम्ही एकदा तरी ऐकलंच असेल…सध्या सोशल मीडियावर अशाच एका आंटीजीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जी डान्सर फ्लोअरवर नाही तर चक्क रोलर ब्लेडवर डान्स करताना दिसून येतेय. डान्स फ्लोअरवर ठुमके लगावणाऱ्या आंटीचे तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. पण रोलर ब्लेडवर डान्स करत या आंटीने सोशल मीडियावर अक्षरशः आग लावली आहे.

आपल्या देशात टॅलेंटची काही कमी नाही आणि सोशल मीडियावर अशा टॅलेंटच्या व्हिडीओचा खजिनाच पहायला मिळतो. अशाच एका महिलेच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेने राजस्थानी पेहराव परिधान करून चक्क रोलर ब्लेडकर राजस्थानी डान्स सादर केलाय. होय, तुम्ही बरोबर वाचलं. जर विश्वास होत नसेल तर हा व्हिडीओ एकदा पाहून घ्या….

Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
jaiswal
जैस्वालला सूर गवसणार? राजस्थान रॉयल्ससमोर आज गुजरात टायटन्सचे आव्हान
mundu-clad gang boys dance on lungi shirt
Video : लुंगी शर्टवर तरुणांनी केला झकास डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल
viral video street vendor selling momo burger
Video : बर्गरमध्ये घातले ‘मोमो अन् नूडल्स’! पण जंक फूडच्या या ढिगावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी व्हाल चकित

या महिलेचं नाव कृष्णा कंवर गेहलोत असं असून त्या एक स्पीड स्केटर आहेत. राजस्थानी पारंपारिक पेहरावात खूपच सुंदर दिसून येत आहेत. एका भरजरी लहंगा चोलीसारख्या दिसणाऱ्या या पेहरावात केवळ डान्स फ्लोअरवर डान्स करणं अनेकांना अवघड जातं. विचार करा, रोलर ब्लेडवर याच पेहरावात डान्स करणं किती अवघड जाईल. पण या व्हायरल व्हिडीओमधल्या कृष्णा गेहलोत यांनी खूपच सुंदर पद्धतीने हा भरजरी पारंपारिक पेहराव कॅरी केलाय.

सोशल मीडियावर होत असलेला हा व्हिडीओ उदयरपूर शहरातला आहे. उदयपूरमध्ये कृष्णा गेहलोत यांचा एक कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी त्यांचा हा डान्स परफॉर्मन्स सादर तिथल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. यापूर्वी ही कृष्णा गेहलोत यांनी आपल्या नावे अनेक रेकॉर्ड केले आहेत. तिच्या या टॅलेंटसाठी अनेक पुरस्काराने गौरविण्यात सुद्धा आलंय. यापैकी काही रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, इंडिया बुक रेकॉर्ड्स आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंदवले आहेत. उदयपूर ते दिल्ली या ७५० किमीच्या प्रवासात भारतीय लष्कर आणि महिला सक्षमीकरणाबाबत जागरूकता पसरवण्याच्या मोहिमेचाही ती एक भाग बनली होती.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘ट्विंकल बायसा’ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ५० हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावरील अनेक यूजर्स या व्हिडीओवर त्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तसंच कमेंट्स सेक्शनमध्ये या महिलेच्या टॅलेंटबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका यूजरने कमेंट करताना लिहिलं, ‘Amazing’, दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘डान्स करणे अवघड नाही, पण रोलर ब्लेडनवरून डान्स करणे खरोखरच धाडसाचे आहे’. तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘अशी प्रतिभा क्वचितच असते.’. याशिवाय अनेक युजर्सनी यावर हार्ट इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.