scorecardresearch

Video: बुलेटवरून Swag Entry घ्यायला निघाली नवरी.. पुढे असं झालं की रस्त्यावरचे लोक सुद्धा बघत बसले

इंस्टाग्राम मॉडेल वैशाली चौधरी हिने अलीकडेच नवरीच्या पेहरावात बुलेट चालवतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

Video: बुलेटवरून Swag Entry घ्यायला निघाली नवरी.. पुढे असं झालं की रस्त्यावरचे लोक सुद्धा बघत बसले
नवरीची Swag Entry (फोटो: Instagram/ VaishaliChaudhari)

लग्नाचे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या नेहमीच पसंतीस उतरतात. युट्युबवर सर्वाधिक व्ह्यूज मिळवणारे व्हिडीओ हे शक्यताः लग्नविधी, प्री- वेडिंग, वर- वधूची रॉयल एंट्री असेच असतात. प्रसिद्ध युट्युबर बॉब आणि कोमल यांनी तर अलीकडे हि लग्नाच्या व्हिडिओची प्रसिद्धी पाहता चक्क युट्युब लाईव्ह वर लग्न केले होते. आपणही इंस्टाग्राम वर वधूच्या डॅशिंग डान्स करत घेतलेल्या एंट्रीचे व्हिडीओ पाहिले असतील मात्र आता व्हायरल होणारा व्हिडीओ अगदी खास आहे. साधारणतः नवरी म्हणजे लाजरी, नाजूक, दबक्या पावलाने येणारी अशी गैरसमजूत खोडून काढण्याचं काम या व्हिडीओ मधील नवरीबाईने केले आहे.

इंस्टाग्राम मॉडेल वैशाली चौधरी हिने अलीकडेच नवरीच्या पेहरावात बुलेट चालवतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. भरजरी लेहेंगा, जड दागदागिने, डोक्यावर दुपट्टा नाकात भली मोठी नथ असा साजशृंगार करून सजलेली वैशाली रॉयल एन्फिल्ड बुलेट चालवताना पाहून भल्याभल्यांच्या काळजाचा ठोका चुकेल.

वैशालीने हा व्हिडीओ शेअर करताना ‘जटनी’ असे कॅप्शन दिले आहे हरायणवी गायक राज मावर याच्या गन या गाण्यावर हा रील बनवून तिने ६ ऑगस्टला पहिल्यांदा शेअर केला होता, ज्यांनंतर तो व्हायरल होत गेला तसे या लुक मधील अन्यही व्हिडीओ तिने शेअर केले आहेत. वैशालीच्या पहिल्या व्हिडीओला १ मिलियनहून अधिक व्ह्यूज व ८३, ००० हुन अधिक लाईक व कमेंट्स आहेत.

Finland च्या पंतप्रधान सना मरीन यांचा पार्टीत जोरदार डान्स झाला Viral; विरोधक म्हणतात दारू पिऊन…

पहा नवरीचा SWAG

वैशालीने यापूर्वी सुद्धा अनेकदा बुलेट चालवतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. महिलांना ड्रायव्हिंग येत नाही असे म्हणणाऱ्यांना चपराक बसवणारे वैशालीचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच गाजत असतात. यामध्ये ज्या सहजतेने ती रॉयल एन्फिल्ड बुलेट चालवते ते नक्कीच कौतुकास्पद आहे.

Instagram Reels Hacks: कमी व्ह्यूजमुळे रील डिलीट करणे ठरेल मोठी चूक; अल्गोरिदम जाणून घ्या

अलीकडे अनेक तरुणी अशा प्रकारे कूल ब्राईड एंट्री घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. तुमचाही यंदा किंवा येत्या काही वर्षात लग्नाचा प्लॅन असेल तर अशा डॅशिंग एंट्रीचा नक्की विचार करू शकता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या