१८ टायरच्या ट्रकने दिलेल्या धडकेनंतर कारचा चेंदामेंदा होऊनही महिला सुरक्षितपणे बाहेर; फोटो पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

१८ टायरच्या ट्रकने दिलेल्या धडकेनंतर कारचा चेंदामेंदा; तरीही महिला सुरक्षितपणे बाहेर

Accident, Car Accident,
१८ टायरच्या ट्रकने दिलेल्या धडकेनंतर कारचा चेंदामेंदा; तरीही महिला सुरक्षितपणे बाहेर (Photo: Trooper Rocky Oliphant/Twitter)

ट्रकने कारला चिरडल्यानंतर महिला अपघातातून बचावल्याची एक घटना समोर आली आहे. १८ चाकांच्या या ट्रकने कारला चिरडल्यानंतर अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. इतका भीषण अपघात होऊनही महिलेला फक्त काही किरकोळ जखमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वॉशिंग्टनमध्ये ही घटना घडली आहे.

या दुर्घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत ट्रकने कारला चिरडल्याचं दिसत आहे. ४६ वर्षीय महिला या कारमधून प्रवास करत होती. इतक्या भीषण अपघातातूनही महिलेचा जीव वाचला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने अचानक ब्रेक दाबल्यामुळे हा अपघात झाला. पुढे ट्राफिक असल्याने महिलेने ब्रेक दाबला असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली आणि हा अपघात झाला. या धडकेमुळे महिलेच कार समोर असणाऱ्या एका ट्रकवर जाऊन आदळली.

अपघातानंतर महिला काही काळासाठी गाडीत अडकली होती. कारची पुढची बाजू उचलण्यात आल्यानंतर महिला सुरक्षितपणे बाहेर आली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. महिलेला काही किरकोळ जखमा झाल्या असून रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Woman escapes with minor injuries after 18 wheeler crushes car sgy

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या