Woman Fight Video Viral : सोशल मीडियावर लहानसहान कारणांवरून झालेल्या भांडणांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात लोक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तर कधी लाठ्या-काठ्यांनी मारहाण करताना दिसतात. यातील काही मारहाणीचे व्हिडीओ फारच भयानक असतात, तर काही व्हिडीओ पाहून हसू आवरणं अवघडं होतं. सध्या सोशल मीडियावर दोन महिलांच्या मारामारीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही डोक्याला हात माराल. ग्राहकांनी गजबजलेल्या बाजारात दोन महिलांच्या मारामारीची ही घटना घडल्याने काहीवेळ तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी ही घटना आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केली.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होती. याच गर्दीत दोन महिलांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला त्या एकमेकींवर ओरडत होत्या, काही क्षणात हा वाद विकोपाला पोहचला, यानंतर दोघी एकमेकींना मारहाण करू लागल्या. यातील एक महिला दुसरीला दे दणादण मारताना दिसतेय. एकामागून एक तिच्या पाठीवर चापट मारत राहते आणि ती मार सहन करत होती. मारहाण करणाऱ्या महिलेला अनेकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही कोणाचं ऐकत नव्हती. एवढ्यात मार सहन करणारी महिला पटकन गर्दीतून वाट काढत पळून जाते. या दोघींमध्ये नेमका कशामुळे वाद झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

View this post on Instagram

A post shared by ?️ MR KOUSHIK ?️ (@mr__koushik90)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांच्या हाणामारीमुळे बाजारात काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी बघ्यांचीदेखील मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. @mr_koushik90 या अकाउंटवरून हा व्हिडीओ अपल़ो़ड करण्यात आला आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, महिला कुठेही, कधीही मारामारी करू शकतात. दुसऱ्याने लिहिले की, नागरिकांना फ्रीमध्ये शो पाहायला मिळाला.