Viral Video : झुरळाला घाबरणाऱ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ दाखवाच!

या तरूणीला काय म्हणावं

(छाया आणि व्हिडिओ सौजन्य : 9 News Darwin/Facebook)

महिलांना आपल्या समोर साधं झुरळ जरी दिसलं तरी त्यांची किती घाबरगुंडी उडते. झुरळ, पालं दिसली की सारं घर आरडाओरडा करून ते डोक्यावर घेतील. आता तुमच्या ओळखीच्या मैत्रिणींना असं करायची सवय असेल तर त्यांना या तरूणींचा व्हिडिओ दाखवा. आपल्या डेक्सवर दोन फुटांचा साप दिसल्यावर कोणताही आरडाओरडा न करता या तरूणीने तो हाताने पकडला आणि त्याला सरळ पिशवीत भरून लांब सोडून दिलं. तुमचाही यावर विश्वास बसत नाहीय ना? ‘ ९ न्यूज डार्व्हिन’ने आपल्या न्यूज रुममधला एका व्हिडिओ अपलोड केला असून हा व्हिडिओ तुफान प्रसिद्ध होत आहे. या न्यूज चॅनेलच्या कॅमेरावुमनला डेक्सवर कोपऱ्यात दोन फुटांचा साप रेंगाळताना दिसला. तेव्हा अत्यंत शांतपणे काठीच्या मदतीने तिने या सापाला कोपऱ्यातून बाहेर काढेल आणि या सापाला सहकाऱ्याच्या मदतीने पिशवीत भरलं. तिने ज्या पद्धतीने ही सारी परिस्थिती हाताळली ती इतकी कमालीची होती की अशा पद्धीतने कोणा मुलीला असं करताना पाहिलं नसेल हे नक्की.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Woman finds a snake on her work desk brave woman pulled out and put it in a bag

ताज्या बातम्या