बंगळुरु या ठिकाणी एका इंजिनिअर जोडप्याला अॅमेझॉन कंपनीने जे पार्सल पाठवलं त्या पार्सल बॉक्समध्ये कोब्रा साप निघाल्याची बातमी ताजी असतानाच आता अशीच आणखी एक बातमी समोर आली आहे. एका महिलेला झेप्टो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी चेनकडून आलेल्या चॉकलेट सिरपच्या सिलबंद बाटलीत मृत उंदीर आढळला आहे. या महिलेने या संदर्भात एक सविस्तर इंस्टाग्राम पोस्ट लिहिली आहे. तसंच तो व्हिडीओही याबरोबर पोस्ट केला आहे जो चांगलाच व्हायरल होतो आहे.

काय घडली घटना?

एका महिलेने Heshey (हर्शी) कंपनीचं चॉकलेट सिरप मागवलं. झेप्टो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅपचा वापर या महिलेने केला. प्रमी श्रीधर असं या महिलेचं नाव आहे. प्रमी श्रीधर यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो व्हायरल होतो आहे.

couple in bengaluru finds Alive cobra in amazon Box
बापरे बाप! Amazon चं पार्सल उघडताच बाहेर आला साप, दाम्पत्याची घाबरगुंडी, कंपनीने दिलं ‘हे’ उत्तर
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Porsche Crash: “अपघातात दोघांना चिरडून ठार करणाऱ्या मुलावरही आघात झालाय, त्याला..” मुंबई उच्च न्यायालयाचं मत
pooja khedkar ias mother manorama khedkar viral video
आता IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा चर्चेत; गावकऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावतानाचा Video व्हायरल!
chappal at modi car video
Video: पंतप्रधान मोदींच्या कारवर फेकली चप्पल, व्हिडीओ व्हायरल; कार पुढे येताच सुरक्षा रक्षकाने…
Hajj Pilgrims Die Heat wave
Heat wave : हजसाठी गेलेल्या ५५० भाविकांचा मक्केमध्ये उष्माघाताने मृत्यू, २,००० यात्रेकरू रुग्णालयात दाखल
kashmira pawar satara arrested forged as pmo appointed
साताऱ्यातील कश्मिरा पवारची ‘घोटाळा’झेप; आधी उत्तुंग कामगिरीच्या बातम्या, नंतर फसवाफसवी झाली उघड!
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
Indian millionaires left country
भारतातून कोट्यधीशांचं आऊटगोईंग चालूच; यावर्षीही तब्बल ४,३०० धनाढ्य देश सोडणार

प्रमी श्रीधर यांचं म्हणणं आहे की मी झेप्टोवरुन हर्शी कंपनीचं चॉकलेट सिरप मागवलं. हे चॉकलेट सिरप घरी आलं तेव्हा सिलबंद बाटलीत होतं. सिरप केकवर ओतणार होतो त्यासाठी ते चमच्यात घेतलं तेव्हा त्यात एक केस आढळला. आत काय आहे हे पाहण्यासाठी जेव्हा आम्ही रिकाम्या भांड्यात ते सिरप ओतलं तेव्हा त्यात मृत उंदीर आढळून आला असं प्रमी श्रीधर यांनी म्हटलं आहे. आम्ही हे सिरप झेप्टो वरुन मागवलं होतं. ब्राऊनी केकवर ते सिरप टाकून आम्हाला खायचं होतं. पण जो प्रकार घडला त्यामुळे आमची झोप उडाली आहे. सुरुवातीला आम्हाला कळलं नाही कारण त्या मृत उंदराभोवती चॉकलेटचा थर जमा झाला होता. मात्र आम्ही जेव्हा त्यावर पाणी ओतलं तेव्हा कळलं की तो एक मृत उंदीर होता. असं प्रमी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

बापरे बाप! Amazon चं पार्सल उघडताच बाहेर आला साप, दाम्पत्याची घाबरगुंडी, कंपनीने दिलं ‘हे’ उत्तर

हर्शी या कंपनीने यावर काय उत्तर दिलं आहे?

आम्ही जो काही प्रकार तुमच्या व्हिडीओत पाहतो आहोत तो धक्कादायक आहे. आम्ही त्याबाबत दिलगीर आहोत. या बाटलीवर असलेला यूपीसी आणि मॅन्युफॅक्चरिंग कोड आम्हाला पाठवावा. तसंच ११०८२१६३ या क्रमांकावर फोन करावा. आमचे अधिकारी तुम्हाला योग्य सहकार्य करतील असं या कंपनीने म्हटलं आहे.

प्रमी श्रीधर यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल

प्रमी श्रीधर यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मात्र चांगलाच व्हायरल झाला आहे. तुम्ही त्या हर्शी कंपनीच्या विरोधात कोर्टात धाव घ्या. तसंच अन्न आणि औषध प्रशासनाला प्रकार कळवा असा सल्ला त्यांना अनेक नेटकऱ्यांनी दिला आहे. या सगळ्यात झेप्टोची काही चूक नाही त्यांनी फक्त हर्शी कंपनीचं उत्पादन तुमच्यापर्यंत पोहचवलं आहे. तुम्ही त्या कंपनीच्या विरोधात कोर्टात खटला दाखल केला पाहिजे. झेप्टोची ही जबाबदारी नाही. असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. आमच्या घरातल्या काही लोकांनी त्या सिरपची चव घेतली होती. जे आजारी झाले, त्यांच्यावर आता उपचार करण्यात आले आहेत. असंही प्रमी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलं.