गाडी वेगात चालवली किंवा वेगाची मर्यादा ओलांडली म्हणून एखाद्या चालकावर कारवाई केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण कॅनडात याहून अगदी उलट घडलं आहे आणि हे वाचून तुम्हालाही हसू येईल. गाडी किमान मर्यादेपेक्षाही हळू चालवली म्हणून एका महिलेवर चक्क कारवाई करण्यात आली आहे. हे ऐकून तुम्हालाही यावर विश्वास ठेवणं कठीण जात असलं तरी हा प्रकार खरच घडला आहे.

Video : हा ठरला यूट्युबवर सर्वाधिक पाहिला गेलेला दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ

एडिटिंगची कमाल आणि अफवांची धम्माल! यामुळेच ‘ती’ विद्रूप दिसू लागली

त्याच झालं असं ऑन्टॅरिओमधील महामार्गावर ४७ वर्षीय महिला गाडी चालवत होती. ती ४० किलोमीटर प्रतितास या वेगानं आपली गाडी चालवत होती. तिचा गाडी चालवण्याचा वेग पाहून काही चालकांना त्रास झाला. महामार्गावर तिच्या गाडी चालवण्याच्या वेगामुळे वाहतूक कोंडी झाली आहे, अशी तक्रार पोलिसांना रात्री आठ वाजताच्या सुमारास मिळाली. मग काय पोलिसांनी तडक महामार्गाच्या दिशेनं धाव घेत या महिलेला हेरलं. या महामार्गावर किमान वेगाची मर्यादा ही ६० किलोमीटर प्रतितास आहे. पण, ही महिला ४० किलोमीटर वेगानं गाडी चालवत होती. त्याच्या धीम्या गतीनं गाडी चालवण्यामुळे इतर चालकांना त्रास झाला म्हणूनच तिच्यावर ऑन्टॅरिओ प्रोव्हिजनल पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. जलद गतीच्या महामर्गावर धीम्या गतीनं गाडी चालवणं, वाहतुकीचे नियम न पाळणं आणि गाडीचा विमा नसणं या कारणांमुळे तिला दंड आकारण्यात आला.