scorecardresearch

एका सेकंदासाठी महिला उठली खुर्चीवरून, अन्….; पहा Viral Video

घरात लहान मुलं असलं की ते घरभर गडबड करत राहतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये लहान मुलाचे कृत्य पाहून तुम्हाला हसू येईल.

मुलाचा हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (photo credit: instagram/ @cute_baby_reel)

तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की लहान मुलं खूप खोडकर असतात. अनेकवेळा ही मुलं कधी कधी अशी कृत्य करतात की ज्याचा विचार करून आपण आश्चर्य होतो. त्याच वेळी त्यांच्या खोडसाळपणामुळे लोकांचे नुकसान देखील होते. मुलांना थोडं चालता आलं की ते एका जागी बसतही नाहीत. मग त्यांना एकाच ठिकाणी ठेवणे खूप कठीण होऊन बसते.

लहान मुलं एकदा चालयला लागली की एका जागी थांबत नाहीत असं आपण पाहतोच. त्यात ही लहान मुलं घरभर गडबड करत राहतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये लहान मुलाचे कृत्य पाहून तुम्हाला हसू येईल. मुलाचा हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, एक लहान मुल असे कृत्य करतो, ज्यामुळे एक महिला धक्क्याने जमिनीवर पडते.

एका रेस्टॉरंटमध्ये एक कुटुंब जेवण जेवत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सर्वजण बसून जेवताना दिसत आहेत. या कुटुंबासोबत एक लहान मूलही आलेलं असतं. वॉकरच्या मदतीने मूल इकडे तिकडे फिरत आहे. त्यात ही महिला फक्त एका सेकंदासाठी तिच्या स्टूलवरून काहीतरी घेण्यासाठी उठते. दरम्यान, त्या लहान मुलाने जे काही केलं ती महिला स्टूलवर बसण्याऐवजी जोरात खाली पडते.

लहान मुल खेळता खेळता त्या महिलेचे स्टूल ओढून तेथून काढत असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळते. यानंतर, महिलेने स्टूलवर बसण्याचा प्रयत्न करताच. तशीच ती जोरात खाली पडते. व्हिडीओ पाहून असे दिसते की, मुलाने खेळण्याच्या नादात हे जाणूनबुजून केले नसून, नकळतपणे महिला जमिनीवर कोसळली. पहा हा व्हिडीओ-

इंस्टाग्रामवर cute_baby_reel नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ खूप वेगाने पाहिला आणि शेअर देखील केला जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman got up from the chair for 1 second naughty child did such a thing she fell down scsm

ताज्या बातम्या