सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची असते मग ती मेट्रो असो, रेल्वे असो, बस असो की एसटी बस. रोज लाखों प्रवासी याचा वापर करून प्रवास करतात. वाढती प्रवाशांची संख्या पाहता अनेकदा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. तरीही अनेकदा गर्दी मध्ये धक्के सहन करत लोक प्रवास करतात. अनेकदा बसून प्रवास करावा या आशेने लोक सीट पकडण्याचा प्रयत्न करतात तर कधी एका सीट साठी भांडताना दिसतात. अशा अनेक घटनांचे व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान आता एक विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एका महिलेचं डोकं बसच्या खिडकीच अडकल्याचं दिसत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. हेही वाचा - आरारा खतरनाक! ‘तौबा तौबा’ गाण्यावर परदेशातील चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO युजर्स करतायत कौतुक आतापर्यंत जागा पकडण्यासाठी खिडकीतून बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची सोशल मीडियावर चर्चा होत होती. आता खिडकीमध्ये डोकं अडकवणाऱ्या या महिलेची चर्चा होत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की महिलेच अडकलेले डोक बाहेर काढण्यासाठी चालक प्रयत्न करत आहे. खिडकी हलवण्यासाठी जागा देखील शिल्लक नाही. शेवटी कसे तरी ती महिला आपले डोकं आत खेचते. महिलेची अवस्था पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. हेही वाचा - पाळीव श्वानाने चक्क घरात लावली आग, पॉवर बँक चघळल्याने झाला स्फोट, पाहा Video Viral हा व्हायरल व्हिडिओ कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ( KSRTC) बसचा आहे. इंस्टाग्रामवर apli_lalpari या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "असं डोकं बसच्या खिडकीतून बाहेर काढणे बरं नाही, सावध राहा" व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी प्रश्नही विचारला पण महिलेचं डोकं खिडकीच्या बाहेर गेलंच कसे?