Accident Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात आपण अनेकदा अपघातांचे व्हिडीओही पाहिले असतील. अशा अपघातात काही जण आपला जीव गमावतात तर काहींना जीवनदान मिळतं. अपघात झाल्यानंतर दोन गटांमध्ये अनेकदा वाददेखील होतात आणि त्याचं रुपांतर मारामारीमध्ये होतं.

भररस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असतात. पण, तुम्ही कधी पेट्रोल पंपावर झालेला अपघात पाहिलाय का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका महिलेने तिची स्कूटर थेट पेट्रोल पंपावर नेली आणि एका माणसाला जोरात धडक दिली. या धडकेमुळे तो माणूस थेट महिलेच्या स्कूटरवर जाऊन बसला आणि पुढे जाऊन आदळला.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Viral video of girls fighting in a class and a boy angrily hits the bench
“एकमेकींच्या जीवावरच उठतील”, भरवर्गात दोन मुलींचं भांडण सुरू असताना मुलाचा राग अनावर, पुढच्याच क्षणी त्याने जे काही केलं ते भयंकर
Woman beats thief for stealing phone in up Meerut viral video on social media
“मॅडम, किती माराल…”, ‘या’ कारणामुळे महिलेने दिला तरुणाला चोप, लाथा बुक्क्यांनी मारलं अन्…, VIDEOमध्ये पाहा नेमकं काय घडलं?
Heart touching video of police who help poor man on road video goes viral
“शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा; VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
lightening strike on front of man while he shooting in mobile shocking video goes viral on social media
मरण इतक्या जवळून कधी पाहिलंय का? घराच्या बाहेर येताच घडलं भयंकर; हृदय कमकूवत असेल तर हा VIDEO पाहूच नका
pick up tempo fell in creek while being loaded into boat in Raigad
Video : रायगडमध्ये बोटीत चढवतांना पिकअप टेम्पो खाडीत पडला… घटना सीसीटीव्हीत कैद

हेही वाचा… VIDEO: भरजत्रेत कपलचा रोमान्स, आकाशपाळण्यात केलं किस अन्…., बेभान जोडप्याने हद्द केली पार

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचारी बॉटलमध्ये पेट्रोल भरताना दिसत आहे आणि त्याच्या बाजूला एक माणूस उभा आहे. अशातच अचानक मागून भरवेगात एक स्कूटर येते. ही स्कूटर एक महिला चालवत असते. वाऱ्याच्या वेगात येऊन ही महिला चक्क तिथे उभ्या असलेल्या माणासाला धडक देते. धडक देताच हा माणूस पुढे जाऊन आदळतो. ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळलेलं नाही.

हा व्हायरल व्हिडीओ @doaba_x08 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “मी तर सरळ जात होते मध्येच पेट्रोल पंप आलं” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल १.१ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… कॉलेजमध्येच मृत्यूने गाठलं! स्टेजवर डान्स करताना तरुणीने सोडले प्राण, नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बिचाऱ्याची काय चूक.” तर दुसऱ्याने “पापा की परी” अशी कमेंट केलीय. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “बरं केलं त्या माणसाला आपल्या स्कूटरने बाजूला केलं, उगाच मध्ये उभा होता.”

हेही वाचा… हद्दच झाली राव! माणसाने भररस्त्यात केलं महिलेच्या पोस्टरबरोबर असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अश्लील…”

दरम्यान, याधीही सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यात अपघातानंतर भांडणं आणि हाणामारी झाली आहे, जी जीवावरदेखील बेतली आहे.

Story img Loader