देशात सध्या घटस्फोटांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अंतर्गत मतभेद किंवा पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून सर्वसाधारणपणे महिला आपल्या पतीला घटस्फोट देतात. परंतु पंजामधील एका महिलेने चक्क आपल्या मुलीच्या दिराबरोबर लग्न करण्यासाठी नवऱ्याला घटस्फोट दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
घटस्फोट घेतल्यानंतर या ३७ वर्षीय महिलेने आपल्या १८ वर्षीय मुलीच्या दिराशी लग्न केले. हा व्यक्ति या महिलेपेक्षा तब्बल १५ वर्षांनी लहान आहे. मुलीच्या लग्नात सर्वात प्रथम दोघांची भेट झाली. यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. या अनैतिक संबंधांमुळे त्या महिलेचे आपल्या पतीबरोबर जोरदार खटके उडू लागले. अखेर एके दिवशी तिने आपल्या पतीला घटस्फोट देऊन आपल्या मुलीच्या दिराबरोबर लग्न केले. मात्र, या नव्या नात्याला दिराच्या कुटुंबीयांनी अद्याप संमती दिलेली नाही.