scorecardresearch

Premium

दिल्लीत बसमध्ये महिलांचा तुफान राडा; एकीचा कान फाटला तर दुसरी…VIDEO पाहून व्हाल थक्क…

Viral video:महिलांचा बसमधील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Woman inside Delhi government bus over seat issues Woman Critically Injured
बसमधील सीटवरुन महिलांची हाणामारी

Viral video: ट्रेन असो, बस असो वा मेट्रो प्रवाशांमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वाद सुरु असतात. कधी धक्काबुक्कीवरून वाद सुरु होतात तर कधी सीटवरून बाचाबाची होते. ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही देखील अशाप्रकारची भांडण, हाणामारी पाहिली असेल. ट्रेनमधील भांडण कधी-कधी इतकी टोकाला जातात की, प्रवासी एकमेकांवर हात उचलतात. यावेळी इतर प्रवासी त्यांचे भांडण सोडवण्यासाठी पुढे येतात. ट्रेनमध्ये अनेकदा सीटवर बसण्यावरूनच सर्वाधिक भांडणं होत असतात. या भांडणाचे नंतर हाणामारीत रुपांतर होते. सध्या सोशल मीडियावर बसमधील महिलांच्या भांडणाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात दोन्ही महिला सीटवरून एकमेकांशी जोरदार भांडत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन महिला बसमध्ये एकमेकांशी भांडताना दिसत आहे. दोन्ही महिला सीटसाठी एकमेकांशी भांडत होत्या, असे सांगितले जात आहे. यामध्ये अक्षरश: एका महिलेला दुसऱ्या महिलेनं खाली पाडलं आहे. या महिलांची हाणामारी इतकी जोरात होते की यामध्ये महिला गंभीर जखमी होते. एका महिलेचा भांडणामध्ये कान फाटतो आणि रक्तस्त्राव होतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला तिच्या ओढणीला रक्त पुसत आहे.

Mumbai Local Train Video
Mumbai Video : लोकलच्या महिला डब्यात महिलांचाच राडा, व्हिडीओ होतोय व्हायरल
ms dhoni appointment letter for ticket collectors job in indian railways goes viral
महेंद्रसिंग धोनीच्या पहिल्या सरकारी नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर होतंय व्हायरल; PHOTO पाहून चाहते म्हणाले, ‘व्वा…”
model wearing caged rat high heel on street
फॅशन म्हणून चक्क पायात घातला उंदराचा पिंजरा! पाहा हा Video पाहून तुम्ही चक्रावून जाल
do Vyaghrasana know its health benefits
Vyaghrasana Yoga : तासन् तास बसून काम करत असल्यामुळे पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास वाढलाय? मग व्याघ्रासन योगा करा

यावेळी बसमध्ये उपस्थित इतर प्रवासी दोन्ही महिलांना समजावण्याचा प्रयत्न करताना आणि त्यांना शांत होण्यास सांगताना दिसत आहेत. बसमध्ये सीटवरून भांडण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकवेळा असे व्हिडिओ समोर आले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: आनंद शोधला की सापडतोच! दोन वेळच्या अन्नाची भ्रांत, डोक्यावर छप्पर नाही, मात्र चिमुकल्यांचं जगणं एकदम रॉयल

हा व्हिडीओ @gharkekalesh या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत, ‘WWE एक्सप्रेस’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, आम्ही ट्रेनमध्ये जाते तेव्हा आम्हालाही असे सज्जन लोक भेटतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman inside delhi government bus over seat issues woman critically injured video goes viral srk

First published on: 03-12-2023 at 17:50 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×