Viral video: ट्रेन नेहमी प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. गर्दीमुळे चाकरमानी अक्षरश: लोकल ट्रेनच्या दारात उभे राहूनही प्रवास करतात. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा उभे राहूनच प्रवास करावा लागतो. आजवर ज्यांनी लोकलने प्रवास केलाय, त्यांच्यासाठी ट्रेनमधील भांडणं हा काही नवीन विषय नाही. पण, आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये लोकलमध्ये सीटवर बसण्यावरून दोन महिलांची तुफान भांडणं सुरू झाली. या भांडणाचा व्हायरल व्हिडीओ आता जोरदार चर्चेत आहे. चला तर नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया… सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओने लोकांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये दोन महिला सीटवरून एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. हाणामारीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. आपण सोशल मीडियावर महिला, तरुणींच्या फ्री स्टाइल हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्येही महिला एकमेकांसोबत वाद घालताना दिसत आहेत. या महिलेची आरेरावी पाहून मात्र नेटकरी संतापले आहेत. एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील महिला पिवळ्या ड्रेसमधील महिलेच्या सीटवर बसली आहे. ही महिला आपल्या मुलासह सीटवर आरामात झोपली आहे. तेव्हा पिवळ्या ड्रेसमध्ये एक महिला तेथे आली आणि तिला खाली उतरण्यास सांगितले. यावर हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील महिलेने खाली उतरण्यास स्पष्टपणे नकार दिला. एवढंच नाही तर समोरच्या महिलेची कन्फर्म सीट असूनही ही महिला पुढे हद्दच पार करते. वर बसलेली महिला खाली उभ्या महिलेला शिवीगाळ करत "काय करायचं ते कर मी उतरणार नाही. असं म्हण पुढे अपशब्द वापरत आरेरावी करताना दिसत आहे. दरम्यान यानंतर महिलेचे गैरवर्तन वाढत जाते आणि प्रकरण टीटीईला बोलावण्यापर्यंत पोहोचते. व्हायरल व्हिडिओमध्ये ती महिला वारंवार म्हणत आहे की, ही माझी कन्फर्म सीट आहे, कृपया खाली उतरा. मात्र वर बसलेली महिला काही ऐकायला तयार नाही. महिला आपापसात वाद घालत राहिल्या मात्र एकाही प्रवाशानं येऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला दिसला नाही. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> “घरची जबाबदारी सगळं करायला भाग पाडते” विशाल समुद्रात पोटासाठी तरुणांचा संघर्ष; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी संतापले लोक @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत चार लाख २९ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी व्हिडीओला लाइकही केले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया युजर्स या महिलांना विविध प्रकारचे सल्ले देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले… ही एक साधी बाब आहे, तुम्ही टीटीला कॉल केला असता, त्याने तुम्हाला बाहेर काढले असते. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… हे अतिशय लज्जास्पद आहे.