Woman Kissing Anaconda Viral Video : वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ते शिकारीचे असतात तर कधी एखाद्या गमतीदार प्रसंगाचे. पण, काही वेळा प्राण्यांचे असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून खूप भीती वाटते. यात आता एका महाकाय अॅनाकोंडाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडीओत एक महिला नदीच्या मधोमध आनंदाने बसून एका महाकाय अॅनाकोंडाला मिठी मारत आहे, ज्याचे नाव ऐकूनच अनेकांना घाम फुटतो, त्या अॅनोकोंडाला तिने गळ्यात गुंडाळलेय आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवतेय.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक महिला चिखलाने भरलेल्या नदीत आरामात बसलेली दिसत आहे. तिच्या गळ्याभोवती जगातील सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली सापांपैकी एक असलेला अॅनाकोंडा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अॅनाकोंडा गळ्यात घालूनही तिला भीती वाटत नाही, उलट ती प्रेमाने अॅनाकोंडाच्या कपाळाचा किस घेत आहे.
या धाडसी महिलेचे नाव डॅनिएला व्हिलारोएल आहे. डॅनिएला एक वन्यजीव संरक्षक आणि ‘अमेझॉन रेस्क्यू अँड कॉन्झर्वेशन अलायन्स’ची सदस्य आहे. वन्यजीवांबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी ती अनेकदा धोकादायक प्राण्यांचे व्हिडीओ शेअर करते. तिचा हा व्हिडीओ अमेझॉनच्या घनदाट जंगलातील एका नदीत चित्रित करण्यात आला आहे.
ॲनाकोंडा विषारी नसतात, पण त्यांच्यात मोठ्या मोठ्या भक्ष्याची हाडे मोडण्याइतकी आणि त्याला काही सेकंदात गिळण्याइतकी ताकद असते. डॅनिएला प्राण्यांना हाताळण्याचा दांडगा अनुभव असल्याने ती ॲनाकोंडाला अगदी सहजपणे हाताळतेय.
ॲनाकोंडाचा हा धडकी भरवणारा व्हिडीओ @dani.villar_नावाच्या इस्टाग्रामवर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे; तर अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, “ह्या महिलेवर एकदा का ॲनाकोंडाने हल्ला केला तर थेट स्वर्गातच जाईल.” दुसऱ्याने म्हटले की, “ताई, हे प्रेम भारावून टाकणारे असू शकते, काळजी घे.” आणखी एका युजरने लिहिले, “तुला एवढं धाडस कुठून मिळतं?”
