scorecardresearch

Premium

बापरे! महाकाय अजगराने महिलेला घातला विळखा, पुढे काय घडलं? Video पाहून थरकाप उडेल

एका महिलेनं विशाल अजगराला पकडल्यानंतर पुढे जे काही घडलं, ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Huge Python Snake Video
विशाल अजगराने महिलेला घातला विळखा. (Image-Instagram)

खतरनाक प्राण्यांपेक्षाही सापाला लोक जास्त घाबरतात. कारण साप विषारी असेल किंवा तो अजगरासारखा विशाल असेल, तर अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. किंग कोब्रा, अजगरासारखे साप समोर दिसल्यास भल्या भल्यांचा थरकाप उडतो. पण काही लोक अजगरासोबत मस्ती करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका महिलेनं विशाल अजगराला पकडल्यानंतर पुढे जे काही घडलं, ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला भल्यामोठ्या अजगर सापाला खांद्यावर घेते. विशाल अजगराला पकडताना त्या महिलेला जराही भीती वाटत नसल्याचं व्हिडीओत दिसत आहे. अजगराने महिलेला विळखा घातलेला असतानाही सापासोबत ती महिला बिंधास्त मस्ती करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अजगराला पकडल्यानंतर महिला कशाप्रकारे रिअॅक्शन देते, ते पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण इतक्या मोठ्या अजगराला समोर पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पण या महिलेनं न घाबरता अजगराला पकडलं.

pune tvs showroom fire, fire breaks out in tvs showroom, 25 bikes gutted in pune
पुणे : सिंहगड रस्त्यावर दुचाकी विक्री दालनात आग; २० ते २५ दुचाकी जळाल्या
Snake viral video
पावसाळ्यात बूट घालताना सावधान रहा! बुटात वेटोळे घालून बसलेल्या सापाचा VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल
Indian Snakes Viral Video
खतरनाक सापाला सहज हातात गुंडाळलं, तरुणीची हिंमत पाहून सर्वच झाले थक्क, पाहा व्हायरल video
King Cobra Dangerous Video Viral
Video : सर्वात मोठ्या किंग कोब्राशी नडला! पण सापाने पाण्यातच तरुणाला घाम फोडला, फणा काढला अन्…

नक्की वाचा – आरारारारा खतरनाक! शेतकऱ्याने मळ्यात उगवली जगातील सर्वात मोठी काकडी, वजन ऐकून डोकच धराल, पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

@snakesrealm नावाच्या पेजवर अजगराचा हा भयानक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. १६ सप्टेंबरला शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर पाच हजरांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, असं वाटतंय ती महिला सापाला उचलून वेट लिफ्टिंग करत आहे. तर दुसऱ्या एकाने म्हटलं, कोणताच माणूस अशा सापाच्या हल्ल्यातून वाचेल, असं मला वाटत नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman lifted dangerous python snake on her shoulder see what happens next shocking video clip viral on internet nss

First published on: 24-09-2023 at 19:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×