असं म्हणतात की पन्नाची भूमी कुणालाही गरिबीतून श्रीमंतीत घेऊन जय शकते. इथे कोणाचे नशीब कधी उजळेल, हे सांगणे कठीण आहे कारण पन्ना जिल्हा हा भारतात आणि जगात हिऱ्यांचे शहर म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच पन्नाच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक आपले नशीब आजमावण्यासाठी येथे येतात. असेच काहीसे बुधवारी जस्मिन राणी या महिलेसोबत घडले. या महिलेला पन्ना येथील एका खाणीत २.०८ कॅरेटचा हिरा सापडला.

जस्मिन राणी पन्ना जिल्ह्याच्या मुख्यालयाला लागून असलेल्या अंतरकला या छोट्याशा गावातील रहिवासी आहे, जी आता करोडपती झाली आहे. कारण तिच्या हाती अमूल्य हिरा लागला आहे. कृष्णा कल्याणपूर पट्ट्यातील उथळ हिऱ्याच्या खाणीतून जस्मिन राणीला हा हिरा मिळाला. हिरे कार्यालयाकडून भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर राणीच्या वतीने कृष्णा कल्याणपूर पट्टी येथे हिऱ्याची खाण उभारण्यात आली.

अख्ख्या शाळेत दोन तरुणांनी पेंट करून लिहिलं ‘सॉरी’; पोलिसांकडून शोध सुरू

अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर मंगळवारी जास्मिन राणीला खाणीतून जेम्स दर्जाचा २.०८ कॅरेटचा हिरा मिळाला. यानंतर तिने पतीसोबत हिऱ्याचे कार्यालय गाठले आणि हा हिरा जमा केला. जस्मिन राणीचे पती अरविंद सिंह यांनीही हिरा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

जस्मिन राणीचे पती अरविंद सिंह म्हणतात की हिऱ्यांच्या लिलावातून मिळालेल्या पैशातून ते आता पन्नामध्ये जमीन विकत घेतील आणि त्यांच्या स्वप्नातील घर बांधतील. त्याचबरोबर हिऱ्याच्या जाणकारांच्या मते हा जेम्स दर्जाचा हिरा असून त्याला हिऱ्याच्या बाजारात चांगली मागणी आहे. या हिऱ्याची अंदाजे किंमत अंदाजे १० ते १५ लाख रुपये आहे. आगामी हिऱ्यांच्या लिलावात हा हिरा ठेवण्यात येणार आहे.